डाळी file photo
राष्ट्रीय

महागाईपासून दिलासा! केंद्र सरकार देणार भारत ब्रँड डाळी स्वस्त दरात

भारत ब्रँड चना डाळ फेज-२ योजना सुरू

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारत ब्रँड चना डाळ फेज-२ (Bharat Brand Chana Dal Phase-II) योजना सुरू केली आहे. याअंतर्गत भारत ब्रेडची डाळ, भारत हरभरा, भारत मूग अनुदानावर विक्री केले जाणार आहेत. केंद्रीय ग्राहक व्यवहारमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी या योजनेचा शुभारंभ केला. योजनेंतर्गत स्वस्त पीठ, तांदूळ आणि डाळींची विक्री केंद्रीय भांडारच्या स्टोअर्समधून आणि मोबाईल व्हॅनद्वारे केली जाईल. टप्पा-२ साठी शासनाच्या बफर स्टॉकमधून तीन लाख टन हरभरा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातही वितरण

सुरुवातीला दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात डाळींचे वितरण होईल. पुढे १० दिवसांच्या आत भारत ब्रेड उत्पादनांची किरकोळ विक्री देशभरात केली जाईल.

जिन्नसनिहाय दर

हरभरा : ५८ रुपये किलो

हरभरा डाळ ७० रुपये किलो

मूग डाळ : १०७ रुपये किलो

मूग : ९३ रुपये किलो

मसूर डाळ : ८९ रुपये किलो

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT