गुलमर्ग पर्यटन स्‍थळी तुफान हिमवृष्‍टीमध्‍ये अडकलेल्‍या पर्यटकाची भारतीय लष्‍कराज्‍या जवानांनी सुटका केली.  File Photo
राष्ट्रीय

गुलमर्गमध्‍ये तुफान हिमवृष्‍टी, भारतीय लष्‍कर धावले पर्यटकांच्‍या मदतीला

जम्‍मू-काश्‍मीरमधील तनमर्ग मार्ग ठप्‍प, १३७ पर्यटकांची सुटका

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्‍मू-काश्‍मीरमधील गुलमर्ग पर्यटन स्‍थळी तुफान हिमवृष्‍टीमध्‍ये अडकलेल्‍या पर्यटकाची भारतीय लष्‍कराज्‍या जवानांनी सुटका केली. भारतीय लष्कराने गुलमर्ग जिल्ह्यात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्‍याची माहिती 'चिनार कॉर्प्स'ने आज (दि.२८) दिली. दरम्‍यान, हवामान विभागाने जम्मू आणि काश्मीरमध्ये ३० डिसेंबरपर्यंत हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.

नवीन वर्षाच्‍या स्‍वागतासाठी देशभरातील पर्यटनस्‍थळांवर प्रचंड गर्दी होत आहे. जम्‍मू-काश्‍मीरमधील गुलमर्गमध्‍ये तुफान हिमवृष्‍टी होत आहे. तनमर्गचा रस्‍ता बंद झाल्‍याने सुमारे १३७ पर्यटक अडकले होते. प्रशासनाने लष्‍काराला मदतीचे आवाहन केले. तत्‍काळ लष्‍कराचे जवान मदतीला धावले. त्‍यांनी पर्यटकांना सुरक्षित स्‍थळी हलवले आहे. दरम्‍यान, शुक्रवारी जम्‍मू-काश्‍मीर खोऱ्यातील हंगामातील पहिल्या हिमवर्षावानंतर जम्मू आणि काश्मीरच्या (जे-के) अनंतनागमधील काझीगुंड शहरात सुमारे २००० वाहने अडकली असल्‍याची माहिती शुक्रवारी (दि.२७) जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली.

चिनार कॉर्प्सवरील X पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "गुलमर्गच्या पर्यटन स्थळी तुफान हिमवृष्‍टी झाली. त्‍यामुळे तनमर्गचा रस्ता बंद झाला होता. अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी नागरी प्रशासनाने आवाहन केले. त्‍यानुसार १३७ पर्यटकांची सुटका करण्‍यात आली. यामध्‍ये ८ मुलांचाही समावेश आहे. तसेच कुलगाम जिल्‍ह्यात भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने प्रचंड हिमवृष्टीदरम्यान एका गर्भवती महिलेला रुग्‍णालयात दाखले केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT