Indian Air Force Made Proposal in India Rafale :
भारताच्या संरक्षण मंत्रालयाला भारतीय वायू दलाकडून ११४ मेड इन इंडिया राफेल फायटर जेट्सचा प्रस्ताव मिळाला आहे. ही लढाऊ विमानं फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशन आणि भारतीय एरोस्पेस कंपनी यांच्या जॉईंट व्हेंचरमध्ये भारतात बनवण्यात यावी असा प्रस्ताव आहे.
या प्रस्तावानुसार यासाठी २ लाख कोटी रूपयांच्या वर खर्च अपेक्षित आहे. यात जवळपास ६० टक्के पार्ट्स हे भारतीय बनावटीचे असणार आहेत. याबाबतचा निर्णय हा संरक्षण खरेदी समिती घेण्याची शक्यता आहे. या समितीचे अध्यक्ष हे डिफेन्स सचिव असतात. याबाबत काही आठवड्यात निर्णय होणं अपेक्षित आहे.
जर हा डिफेन्स प्रोजेक्ट पूर्णत्वास आला तर हा देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी डिफेन्स डील ठरणार आहे.
याबाबत संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, 'काही दिवसांपूर्वीच ११४ राफेल जेट भारतीय वायू दलाकडून तयार करण्याचा प्रस्ताव किंवा द स्टेटमेंट ऑफ केस मंत्रालयाला मिळालं आहे. या प्रस्तावावर डिफेन्स फायनान्स विभाग देखील विचार तर आहे. यानंतर हा प्रस्ताव डीपीबी यांच्याकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर तो डिफेन्स अॅक्वेजिशन काऊन्सीलकडे येईल.'
या सर्वात मोठ्या डिफेन्स डीलनंतर भारताच्या ताफ्यात मोठ्या संख्येनं राफेल जेट दाखल होण्याची शक्यता आहे. हा ताफा जवळपास १७६ जेट्सचा होईल. भारतीय वायू दलाकडं सध्या ३६ राफेल जेट्सची फ्लीट आहे. याचबरोबर भारतीय नौदलाकनं देखील ३६ राफेल जेट्सची ऑर्डर दिली आहे.
पाकिस्तानविरूद्धच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान, राफेल जेट्सनं चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर संरक्षण मंत्रालयानं आणखी राफेल जेट्ससाठी मोठा प्रस्ताव दिला आहे. राफेल जेट्सनं चीनच्या पीएल १५ या एअर टू एअर मिसाईलविरूद्ध चांगली कामगिरी केली होती. यावेळी स्पेक्ट्रा इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटचा वापर करण्यात आला होता.