Ethanol Use For Cooking pudhari
राष्ट्रीय

Ethanol Use For Cooking: आता इथेनॉल स्वयंपाक घरातही येणार... एलपीजी, पीएनजीची जागा घेणार, मंत्रालय लवकरच धोरण आणणार

Anirudha Sankpal

Ethanol Use For Cooking: पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंड केल्यामुळं गाड्या खराब होत आहे याबाबतच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर सुरू असतात. मात्र आता हे वादग्रस्त इथेनॉल थेट तुमच्या स्वयंपाक घरात येणार आहे. आता जेवण बनवण्यासाठी एलपीजी, पीएनजीच्या ऐवजी इथेनॉल वापरलं जाऊ शकतं. यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय लवकरच एक धोरण आणण्याच्या तायारीत आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, एलपीजी सोबतच घरात जेवण करण्यासाठी इथेनॉलची देखील मदत होणार आहे. हे धोरण सप्टेंबर महिन्यापर्यंत तयार होण्याची शक्यता असून याबाबत मंत्रालयाने अजून पर्यंत कोणतेही उत्तर दिलेले नाही.

२ लाख कोटी रूपयांची होणार बचत

फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या इंटरनॅशनल इस्टिट्युट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या रिपोर्टनुसार इंडिया क्लीन कुकिंग शिफ्टनुसार इ कुटिंग आणि बायगॅसकडे वळल्यामुळं भारत २०५० पर्यंत एलपीजी सबसिडीमध्ये २ लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम वाचवू शकतो.

कोणतं पाऊल उचललं जाणार?

इथेनॉल पर्यावरणानुसार इंधन असून ते ऊस, धान्य आणि इथर शुगरी पिकांच्या फर्मंटेशनने तयार होते. यामुळं एप्रिल महिन्यात इकॉनॉमिक्स टाईम्सने सरकार इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हची चाचणी घेत आहे. जेवण तयार करण्यासाठी इथेनॉलचा वापर करण्याने भारताचे एलपीजीवरील अवलंबत्व कमी होणार असून त्यामुळं एलपीजी आयातीचा जो खर्च असेल तो देखील कमी होणार आहे.

स्वयंपाकघरात इथेनॉलच्या वापरासाठी सरकार एकाचवेळी मोठी गुंतवणूक किंवा सतत आर्थिक सहाय्य म्हणजे सबसिडी देऊ शकते.

भारतात इथेनॉलचे मोठे प्रमाण

इथेनॉलचा वापर जेवण तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यामागे भारतात इथेनॉलची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे हे एक प्रमुख कारण आहे. देशात इथेनॉल उत्पादन क्षमता वर्षाला २० अब्ज लीटरपेक्षा देखील जास्त आहे. या आर्थिक वर्षात अजून ४ अब्ज लीटर वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT