India Flood Relief To Nepal
नवी दिल्ली : पूरग्रस्त नेपाळला भारताची मदत सुरूच आहे. दहा टन मदत सामग्री घेऊन तिसरे विमान शुक्रवारी (दि. २८) काठमांडूसाठी रवाना झाल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली.
या सामग्रीमध्ये पोर्टेबल जनरेटर संच, वैयक्तिक स्वच्छतेचे साहित्य, अन्नाची पाकिटे आणि पाणी शुद्ध करण्याच्या गोळ्यांचा समावेश आहे. या विमानात डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि बोगद्यातील बचाव कार्यासाठीच्या विशेष पथकाचा समावेश असलेले ११ सदस्यांचे पथकही आहे, असे त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले. नेपाळमध्ये सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याला भारताचा पाठिंबा कायम आहे, असे ते म्हणाले.