IPPB PAN card update scam | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना धोका! पीआयबीने केले सतर्क  file photo
राष्ट्रीय

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना धोका! पीआयबीने केले सतर्क

IPPB PAN card update scam | जाणून घ्या कशी टाळावी फसवणूक

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPPB PAN card update scam| इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे (IPPB) अनेक ग्राहक फसवणुकीचे बळी पडत आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांनी पॅन कार्ड अपडेट केले नाही तर २४ तासांच्या आत खाते ब्लॉक होईल, असा संदेश पाठवला जातो. या संदेशांमध्ये ग्राहकांना त्यांचे पॅन तपशील अपडेट करण्यास सांगणारी लिंक पाठवली जाते.

सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या तथ्य तपासणी पथकाने हे संदेश बनावट असल्याची पुष्टी केली आहे. इंडिया पोस्टने कधीही असा संदेश पाठवलेला नाही आणि लोकांना अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका असा इशारा देण्यात आला आहे.

फसवणूक कशी केली जाते?

पॅनकार्ड तपशील अपडेट न केल्यास ग्राहकाचे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक खाते २४ तासांच्या आत ब्लॉक केले जाईल, असा बनावट अलर्ट पाठवतात. हे संदेश अनेकदा खरे असल्याचा भास करून दाखवतात, परंतु प्रत्यक्षात ते संवेदनशील, वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरण्यासाठी पाठवलेले असतात. फिशिंग हा ऑनलाइन फसवणुकीचा एक प्रकार आहे जिथे सायबर गुन्हेगार पासवर्ड, पिन इत्यादी वैयक्तिक माहिती मिळविण्यासाठी लोकांना लक्ष्य करतात.

अशी टाळा फसवणूक

फसव्या संदेशांमध्ये अनेकदा कायदेशीर संस्थांचा संदर्भ असतो. घाईघाईने आणि तातडीच्या विनंत्यांबद्दल नेहमी सावधगिरी बाळगा. याशिवाय कधीही तुमचा पॅन, आधार किंवा बँक तपशील कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका. तुमच्या बँक खात्यांवर लक्ष ठेवा जेणेकरून कोणतेही अनधिकृत व्यवहार त्वरित शोधता येतील. फसवणुकीचे विविध प्रकार समजून घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT