जैसलमेरमध्ये 10 मिनिटांत 6 स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यासोबतच जैसलमेरमध्ये सायरन वाजू लागले. परराष्ट्र मंत्रालयाच्या इशाऱ्यानंतरही पाकिस्तानचे भ्याड कृत्य समजते आहे.
आज सांयकाळी भारत - पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधीचे पाकिस्तानकडून उल्लघंन करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयातर्फे रात्री ११ वाजता विदेश सचिव विक्रम मिसरी यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. तसेच भारतीय सैन्याला सर्व परिने सज्ज राहण्याचे आदेश दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लघंन केल्यानंतर चिनच्या विदेश मंत्रालयाने एक निवेदन जारी केले असून यामध्ये आम्ही पाकिस्तानच्या बाजूने ठामपणे उभे आहोत असे म्हटले आहे. पाकिस्तानचे विदेश मंत्री इशाक डार यांनी चिनचे विदेश मंत्री वांग यी यांच्याशी बातचित केली. यानंतर चिनने आपले निवेदन जारी केले आहे.
पंजाब, राजस्थान याठिकाणच्या अनेक ठिकाणी सध्या शांती असून, सायरनही बंद आहेत. तसेच कोणतेही स्फोटाचे आवाज नसून केवळ खबरदारी म्हणून ब्लॅकआऊट केले असल्याची माहीती समोर येत आहे.
भारत-पाकिस्तान तणावाच्या पाश्वर्श्वभूमीवर शनिवारी दुपारी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली. तथापि, त्यानंतर अवघ्या 3 तासात पाकिस्तानने शस्त्रसंधी भंग करत जम्मूच्या उधमपूरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाककडून गोळीबार करण्यात आला.
या गोळीबारानंतर जम्मू, नौशेरा, अखनूरसह जम्मूच्या अनेक भागात तसेच राजस्थानातील जैसलमेर येथेही ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. या आगळीकीला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. श्रीनगरमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती आहे.
ओमर अब्दुल्लांचे ट्विट
दरम्यान,, "शांतता कराराचं काय झालं? श्रीनगरमध्ये स्फोटांचा आवाज - नेमकं चाललंय तरी काय!" असा उद्विग्न सवाल जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्स पोस्टमधून केला आहे.
J&K | Red streaks seen and explosions can be heard as India's air defence intercepts Pakistani drones amid blackout in Udhampur
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. दिल्लीत या बैठकीला सुरवात झालीआहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख यावेळी बैठकीला उपस्थित आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीद्वारे दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार केल्याचा दावा केला. ट्रम्प म्हणाले की, संपूर्ण रात्रभर अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर मला ही घघोषणा करताना आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तान तत्काळ पूर्ण शस्त्रसंधीसाठी तयार झाले आहेत. दोन्ही देशांचे अभिनंदन.
दरम्यान, पाकिस्तानने देखील शस्त्रसंधीला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून शस्त्रसंधीबाबत सहमती व्यक्त केली आहे. तथापि, भारतात केलेल्या हल्ल्यांच्या प्रयत्नाबाबत त्यांनी माफी मागितलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभुमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकार्याने दोन्ही देशात शस्त्रसंधी करण्यात आलीआहे. पाकिस्तानसोबत आता 12 मे रोजी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली.
विक्रम मिसरी म्हणाले की, शनिवारी 10 मे 2025 रोजी दुपारी 3.35 मिनिटांनी पाकिस्तानचे सैन्य संलाचन महानिदेशक (DGMO) यांचा भारताला फोन आला. त्यानंतर चर्चा आणि सहमती झाली. कोणत्याही अन्य मुद्यावर, कोणत्याही अन्य स्थानी चर्चेबाबत काहीही निर्णय झालेला नाही.
दोन्ही पक्षातील सहमतीनुसार 5 वाजता जमिन, हवा आणि समुद्रातून केले जाणारे हल्ले, गोळीबार थांबविण्याचे ठरले. ददोघांनाही हा निर्णय लागू असेल. यानंतर 12 मे रोजी चर्चा होणार आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्षांचे JD Vance यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांनी केलेल्या कठोर परिश्रमांबद्दल आणि या युद्धविरामात सहभागी होण्याच्या त्यांच्या इच्छाशक्तीबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो."
पाकिस्तानकडून अनेक बाबतीत खोटी माहिती प्रसारित केली गेली. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. तसेच एस ४०० ही सुरक्षायंत्रणा उद्धवस्त केल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णतः खोटा असल्याचे भारताने सिद्ध केले. आहे कर्नल सोफिया कुरेशी यांनी याची माहिती दिली.
भारत पाकिस्तान युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर भारत व पाकिस्तानकडून गोळीबारी व अन्य सैनिकी कारवाया रोखण्यासाठी सहमती दर्शवली आहे. अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे. भारत आता कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याविरोधात कायमच कठोर भूमिका घेईल अशीही स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा केली आहे. तत्काळ प्रभावानंतर भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामाची तयारी केली आहे. तसेच दोन्ही क्षेत्रांमध्ये शांती प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्न सरु आहेत. असेही डार यांनी म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तान हे युद्धविराम करण्यासाठी तयार आहेत. असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यांसदर्भात त्यांनी ट्विट केले आहे.
पाकिस्तानने केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात जम्मू-काश्मिरमधील आरएस पुरा येथे बीएसएफचे 8 जवान जखमी झाले आहेत.
भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढल्यानंतर गुजरात पोलिसांनी राज्याच्या समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा वाढवली; दक्षिण गुजरातमध्ये कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
सूरत रेंजचे आयजी प्रेमवीर सिंग यांनी सांगितले की, "दक्षिण गुजरातमधील समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. पोलिस संवेदनशील भागांमध्ये गस्त घालत आहेत. कोणतीही आव्हाने पेलण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत महत्वाची बैठक घेतली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांसह सीडीएस आणि तीन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी एक महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
त्यानुसार यापुढे भारतातील कोणतीही पाकपुरस्कृत दहशतवादाची कारवाई हे युद्धच समजले जाईल, असा इशाारा पंतप्रधान मोदींनी दिल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.
हैदराबाद (तेलंगणा): AIMIMचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "भारतामध्ये 23 कोटीहून अधिक मुस्लिम राहतात आणि आमच्या पूर्वजांनी मोहम्मद अली जिना यांचा द्विराष्ट्र सिद्धांत नाकारला होता. आम्ही भारताला आपलं राष्ट्र मानलं आहे आणि याठिकाणीच राहणार आहोत."
ओवैसी पुढे म्हणाले, "पाकिस्तान भारताला धर्माच्या आधारावर फोडू इच्छितो. तो हिंदू, मुस्लिम आणि इतर समुदायांमध्ये तेढ निर्माण करत आहे.
जर पाकिस्तान द्विराष्ट्र सिद्धांत मानतो, तर मग ते अफगाणिस्तान व इराणच्या सीमांवर बॉम्बहल्ले का करत आहेत? अफगाणी आणि इराणीही मुस्लिम आहेत. यावरून स्पष्ट होते की, पाकिस्तानची ‘डीप स्टेट’ बेकायदेशीर कृत्यं आणि दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी इस्लामचा केवळ मुखवटा म्हणून वापर करत आहे.
ओवैसी यांनी आरोप केला की, "गेल्या ७५ वर्षांपासून पाकिस्तान भारताविरोधात हाच अजेंडा राबवत आला आहे."
पाकिस्तानने पंजाबमधील गुरूदासपूरमध्ये जिल्ह्यातील शेतात संशयित पाकिस्तानी तोफगोळा (शेल) पडल्याने मोठा खड्डा पडला आहे. सुरक्षा दल आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले असून परिसर सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे.
नवी दिल्ली : सरकारने शनिवारी सर्व मीडिया चॅनेल्सना सूचना दिली आहे की सामाजिक जागरूकता मोहिमांव्यतिरीक्त त्यांच्या इतर कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सिव्हिल डिफेन्स एअर रेड सायरनच्या आवाजाचा वापर करू नये.
फायर सर्व्हिस, सिव्हिल डिफेन्स आणि होम गार्ड्स महासंचालनालयाने दिलेल्या सल्ल्यानुसार, सिव्हिल डिफेन्स कायदा1968 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करत हे आवाहन करण्यात आले आहे.
या सल्ल्यात असं नमूद केलं आहे की, “सायरनचा नियमित वापर केल्यास, नागरिकांचा त्या सायरनकडे गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन कमी होऊ शकतो आणि वास्तविक एअर रेडच्या प्रसंगी नागरिक त्याला प्रसारमाध्यमांची सामान्य गोष्ट समजून दुर्लक्ष करू शकतात.”
सरकारच्या या सूचनेचा उद्देश, सुरक्षा सायरन्सबाबत नागरिकांमध्ये सजगता आणि संवेदनशीलता कायम ठेवणे हा आहे.
पंजाबमधील पठाणकोटजवळ असलेल्या कांगडा जिल्ह्याच्या (हिमाचल प्रदेश) दमताल गावात क्षेपणास्त्रसदृश वस्तूचे अवशेष सापडले आहेत. येथील जमिनीत मोठा खड्डा पडला आहे.
पोलिसांनी सांगितले की, "थोड्या वेळापूर्वी येथे एक स्फोटाचा आवाज आला. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. हा संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. तज्ज्ञच याबाबत नेमकं सांगू शकतील की हे नक्की काय आहे."
जम्मू आणि काश्मीरमधील नौशेरा परिसरातील एका गावात तुर्की बनावटीचा कामिकाझे ड्रोनचे अवशेष सापडले आहेत. पाकिस्तानकडून भारतीय नागरी क्षेत्रांना या ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात येत आहे.
भारताने 7 मे रोजी केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे समोर आली आहेत.
मुदस्सर खडीयन खास उर्फ मुदस्सर उर्फ अबू जुंदाल – हा दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता. त्याच्या निधनानंतर त्याची नमाजे जनाजा (अंत्यप्रार्थना) पाकिस्तानमधील एका सरकारी शाळेत घेण्यात आली. ही प्रार्थना जमात-उद-दावा (JuD) या जागतिक दहशतवादी म्हणून घोषित संघटनेच्या हाफिज अब्दुल रऊफ याने घेतली. विशेष म्हणजे, या प्रार्थना सभेला पाकिस्तान लष्कराचे एक सेवारत लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे महासंचालक (IG) उपस्थित होते.
हाफिज मुहम्मद जमीळ – हा दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी संबंधित होता. तो मौलाना मसूद अझहर याचा मोठा मेहुणा आहे.
मोहम्मद युसुफ अझहर उर्फ उस्तादजी उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहेब – याचा संबंध देखील जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी होता. तो मौलाना मसूद अझहर याचा मेहुणा आहे. याला IC-814 विमान अपहरण प्रकरणात भारतात वॉंटेड घोषित करण्यात आले होते.
खालिद उर्फ अबू अकाशा – हा दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संलग्न होता. त्याने जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग घेतला होता, तसेच अफगाणिस्तानहून शस्त्रांची तस्करी करण्यात तो सक्रिय होता. त्याच्या अंत्यविधीचे आयोजन फैसलाबादमध्ये झाले होते, आणि या प्रसंगी पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व फैसलाबादचे डेप्युटी कमिशनर देखील उपस्थित होते.
मोहम्मद हसन खान – हा दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. तो मुफ़्ती असघर खान कश्मिरी याचा मुलगा होता, जे पाक व्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे ऑपरेशनल कमांडर होते. मोहम्मद हसन खान याने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे समन्वयन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत सकाळी महत्वाची बैठक घेतली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांसह सीडीएस आणि तीन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते.
जम्मूच्या बिशनाह येथील रेहाल, सेडगड भागात भारताने पाडलेल्या पाकिस्तानच्या मिसाईलचे अवशेष आढळून आले आहेत.
अमेरिकेने तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मार्को रुबियो यांनी पाकचे परराष्ट्रमंत्री, लष्करप्रमुख आणि भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी संवाद साधला आहे.
विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून भारतीय एस-४०० प्रणाली नष्ट केल्याचे आणि सुरत आणि सिरसा येथील हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचे दावे करून सतत चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानने केलेल्या या खोट्या दाव्यांचे भारत स्पष्टपणे खंडन करतो."
"पाकिस्तानी सैन्याकडून पश्चिम सीमेवर सतत हल्ले सुरु आहेत; त्यांनी भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रे, युद्धसामग्री आणि लढाऊ विमानांचा वापर केला. पण भारताने त्याचे हल्ले परतवून लावले. पाकिस्तानने २६ हून अधिक ठिकाणी हवाई मार्गाने घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यांनी उधमपूर, भूज, पठाणकोट, भठिंडा येथील हवाई दलाच्या तळांवरील उपकरणांचे नुकसान आणि जीवितहानी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पहाटे १:४० वाजता पंजाबच्या हवाई तळाला लक्ष्य करण्यासाठी हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर केला. त्यांनी आरोग्य सुविधा आणि शाळांवरही हल्ला केला," असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले.
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले, "पाकिस्तानची कृती चिथावणीखोर आणि तणाव वाढवणारी आहे. भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे."
पाकिस्तानने पश्चिम सीमेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे हल्ले हाणून पाडले आहेत. पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार सुरुच असून त्यांनी २६ ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न केला, अशी माहिती आज कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.
गुजरातच्या कच्छ सेक्टरमध्येही भारतीय सैन्याने एल-७० एअर डिफेन्स गनद्वारे पाकिस्तानी सैन्याचे ड्रोन पाडले आहे, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अखनूर क्षेत्रासमोरील पाकिस्तानातील सियालकोट जिल्ह्यातील लूनी येथील दहशतवादी लाँच पॅड बीएसएफने पूर्णपणे उद्ध्वस्त केले.
गुजरातमधील कच्छ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने एल-७० एअर डिफेन्स गनचा वापर करून पाकिस्तानी सैन्याच्या सशस्त्र ड्रोनला यशस्वीरित्या पाडले आहे: संरक्षण अधिकारी
आपल्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले आणि इतर शस्त्रसामग्रीमध्ये वाढ सुरूच आहे. आज पहाटे ५ वाजता, अमृतसरमधील खासा कॅन्टवर अनेक शत्रू सशस्त्र ड्रोन उडताना दिसले. आमच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी शत्रू ड्रोनना त्वरित हल्ला करून नष्ट केले. भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा आणि नागरिकांना धोक्यात आणण्याचा पाकिस्तानचा निर्लज्ज प्रयत्न अस्वीकार्य आहे. भारतीय सेना शत्रूच्या योजना उधळून लावेल, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे.
पाकिस्तानकडून झालेल्या मोठ्या गोळीबारामुळे जम्मूमधील नागरी क्षेत्रातील एका घराचे मोठे नुकसान झाले.
दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव कायम आहे. पाकिस्तानकडून अनेक भारतीय शहरांवर हल्ले करण्यात आले, ज्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. जम्मू-श्रीनगर ते पठाणकोट आणि पोखरणपर्यंत पाकिस्तानचे ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून भारताने १४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद केली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील वाढत्या वादावर चिंता व्यक्त केली आहे. जाणून घ्या भारत-पाकिस्तान संघर्षाची लाईव्ह अपडेट...
आज सकाळी १०:३० वाजता परराष्ट्र मंत्रालय (एमईए) आणि संरक्षण मंत्रालय (संरक्षण मंत्रालय) यांची ब्रीफिंग होणार आहे.
जम्मूजवळ तैनात असलेल्या भारतीय सैन्याने पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड नष्ट केले आहेत.
भारतीय हवाई हल्ल्यांमध्ये पाकिस्तानमधील किमान ४ हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले आहे, असे वृत्त ANIने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात स्फोट झाल्याचे वृत्त आहे. अखनूरमध्ये तीन मोठे स्फोट ऐकू आले. राजौरीमध्येही मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला. पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे राजौरी परिसरात सतत होणाऱ्या स्फोटांमुळे घरे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दिल्ली विमानतळावरील कामकाज सामान्य, काही उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यतादिल्ली विमानतळावरील कामकाज सध्या सामान्य आहे. तथापि, बदलत्या हवाई परिस्थितीमुळे आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या आदेशानुसार वाढलेल्या सुरक्षा उपायांमुळे, काही उड्डाण वेळापत्रकांवर परिणाम होऊ शकतो आणि सुरक्षा तपासणी नाक्यावरील प्रक्रिया वेळ जास्त असू शकतो.
श्रीनगरसह १५ ठिकाणांवरील ड्रोन हल्ले परतवले. दरम्यान उधमपूरच्या दिब्बर भागात मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट उठताना दिसत आहेत. हवाई सायरन वाजवले जात आहेत. पूंछमध्येही सतत स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. दरम्यान, अखनूरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. स्फोटांचे आणि सायरनचे आवाज ऐकू येतात.
शुक्रवारी रात्री पाकिस्तान कडून ४ राज्यामध्ये २६ ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न केला. हे २६ ड्रोन हल्ले निष्फळ करण्यात भारतीय सैन्याला यश आले. पंजाबच्या फिरोजपुर मध्ये एक ड्रोन एका घरावर पडले त्यामध्ये ३ लोक जखमी झाले. तर बाकीचे ड्रोन नष्ट करण्यात यश मिळाले आहे.
नवी दिल्ली: देशभरातील सात संवेदनशील स्थानांवर सैन्याने हालचाली वाढवल्या आहेत. अनेक ठिकाणी ब्लॅक आऊट केला आहे. कुपवाडा, उरी, नॉवगाम - हंडवाडा पुंछ येथे गोळीबारी सुरु असल्याच माहीती समोर येत आहे.