नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण असताना पाकिस्तानना पुन्हा कटोरा घेऊन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) दारात जाण्याच्या तयारीत आहे. भारतासोबत संघर्ष सुरू असताना अशा परिस्थितीत पाक आयएमएफकडे जात असल्याचे पीआयबीने वृत्त दिले आहे. पाकिस्तानी सरकारने मात्र अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव नसल्याचा कांगावा केला आहे.
पाकच्या कॉनॉमिक अफेयर्स डिव्हिजनकडून ‘अधिक कर्ज’ मागणारी पोस्ट द या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली होती. मात्र, ही पोस्ट खोटी असून त्यांचं अधिकृत खाते हॅक झालं होतं, असा दावा पाकिस्तान सरकारने शुक्रवारी केला आहे. पोस्टमध्ये भारतामुळे ‘मोठं नुकसान’ झाल्याचं नमूद करत आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे अधिक कर्ज मागण्यात आलं होतं. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अवघ्या एका तासात पाकिस्तानने रॉयटर्सशी बोलताना ही पोस्ट त्यांनी केली नसल्याचं सांगितलं आणि ‘द’ चे अधिकृत खाते बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट केले.
भारत-पाकिस्तानकडून दोन्ही बाजूंनी हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत. त्यामुळे भारताने आयएमएफकडून पाकला अर्थसहाय्य होऊ नये, यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आयएमएफकडे भारत पाकच्या आर्थिक मदतीबाबत फेरविचार करण्याची मागणी करणार आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही मदत अप्रत्यक्षरीत्या पाकिस्तानच्या लष्करी गुप्तचर संस्थांना व दहशतवादी संघटनांना सहाय्य करत असल्याचे आयएमएफच्या बैठकीत निदर्शनास आणून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.