Government cancels leaves
नवी दिल्ली :भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम बंगाल सरकारने सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या गुरुवारी रद्द केल्या. सध्याची परिस्थिती आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेच्या तयारीची आवश्यकता लक्षात घेता, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला कोणतीही रजा मंजूर केली जाणार नाही, असे दिल्ली सरकारने निवेदनात म्हटले आहे.
पुढील सूचना येईपर्यंत सर्व रजा रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगाल, राजस्थान सरकारने देखील राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.