Image Source X
राष्ट्रीय

भारत - पाकिस्तानने एकमेकांना दिली शस्त्रांस्त्रांची यादी

India - Pakistan List of Weapons | १९८८ च्या करारानुसार याद्यांची देवाणघेवाण

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भारत आणि पाकिस्तानने एकमेकांना आपल्या आण्विक शस्त्रांस्त्रांची यादी दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आण्विक शस्त्रांस्त्रांची यादी देवाणघेवाण करण्याचा करार ३० वर्षांपेक्षा जुना आहे. या करारानुसार दोन्ही देश दरवर्षी १ जानेवारीला त्यांच्या शस्त्रांस्त्रांची यादी एकमेकांना देतात.

१९८८ मध्ये झाला होता करार

भारत आणि पाकिस्तानच्या आण्विक शस्त्रांस्त्रांची यादी आणि त्यांच्याशी संबंधित इतर माहितीची देवाणघेवाण करण्याचा करार १९८८ मध्ये झाला होता. ३१ डिसेंबर १९८८ रोजी दोन्ही देशांच्या सरकारांनी या करारावर स्वाक्षरी केली आणि २७ जानेवारी १९९१ रोजी अंमलात आली. या करारानुसार भारत पाकिस्तामध्ये १ जानेवारी १९९२ रोजी शस्त्रांस्त्रांची पहिली यादी एकमेकांना देण्यात आली. तेव्हापासून दोन्ही देश दरवर्षी १ जानेवारीला ही यादी एकमेकांना देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT