राष्ट्रीय

२०४७ पर्यंत भारत दुग्धजन्य पदार्थांचा मोठा निर्यातदार होणार

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  काही दिवसांपूर्वी देशात दुधाचा तुटवडा असल्याची चर्चा सुरू होती. पण त्यातून सावरताना, २०४७ पर्यंत अमृत कालावधीत भारत दुग्धजन्य पदार्थांचा मोठा निर्यातदार होऊ शकतो, असा विश्वास निती आयोगाने व्यक्त केला आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताला आयात केलेल्या दुग्धजन्य पदार्थांशी स्पर्धा करण्यासाठी स्वतःला तयार करावे लागेल. तरच भारत आंतरराष्ट्रीय बाज- कारपेठेत मोठा निर्यातदार बनू शकेल, असे निती आयोगाने म्हटले आहे.

१९९६-९७ ते २०२१-२२ पर्यंत दरडोई दुधाचे उत्पादन ७१.५ किलो प्रति व्यक्तीवरून वार्षिक १५४.९ किलोपर्यंत वाढले, परंतु जागतिक दूध निर्यातीत भारताचा वाटा फक्त ०.६२ टक्के आहे. आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मुक्त व्यापार करारामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करण्यास भारतातील डेअरी उद्योग सातत्याने विरोध करत आहे, परंतु भविष्यात दूध परदेशी बाजारपेठेत पाठवायचे असेल तर निर्यातीतही आपल्याला स्पर्धा करावी लागेल.

जागतिक स्तरावर ६३ अब्ज किमतीची डेअरी निर्यात

२०१८-१९ मध्येच भारतात दरडोई दुधाच्या वापराची पातळी ३८७ ग्रॅमवर पोहोचली होती. भारत जगातील एक चतुर्थांश दुधाचे उत्पादन करतो, परंतु २०२१ मध्ये भारताने केवळ ३९० दशलक्ष | दुग्धजन्य पदार्थांची निर्यात केली, तर या कालावधीत जागतिक दुग्धजन्य पदार्थांची निर्यात ६३ अब्ज होती. आयोगाचा असा विश्वास आहे की, वाढत्या निर्यातीमुळे शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांचे उत्पन्न क्षेत्र देखील वाढेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT