पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्तातुल्लाह तरार. (Sorce- X)
राष्ट्रीय

Pahalgam Attack | पाकिस्तानची झोप उडाली! भारत २४ ते ३६ तासांत हल्ला करणार, मध्यरात्री दीड वाजता उठून पाक मंत्र्याची पत्रकार परिषद

भारत- पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला

दीपक दि. भांदिगरे

Pahalgam Attack Updates

पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून मंगळवारी रात्री उशिरा दावा करण्यात आला की, भारतीय लष्कर पुढील २४ ते ३६ तासांत हल्ला करण्याची शक्यता आहे. तशी माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली असल्याचे पाकिस्तानमधील एका मंत्र्याने म्हटले आहे.

"पहलगाम हल्ल्यात सहभाग असल्याच्या आरोप करत भारत येत्या २४ ते ३६ तासांत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करण्याचा विचार करत आहे. तशी विश्वासार्ह गुप्तचर माहिती पाकिस्तानला मिळाला आहे," असा दावा पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्तातुल्लाह तरार यांनी मध्यरात्री दीड वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान, पाकिस्तानी सैन्याकडून सीमेपलीकडून सलग सहाव्या दिवशी गोळीबार करण्यात आला. त्याला भारतीय सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी सैन्याने अनेकवेळा नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधींचे उल्लंघन केले आहे. आता त्यांनी जम्मूमधील परागवाल सेक्टरला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर मंगळवारी रात्री गोळीबार केला. यामु‍ळे सीमेवर तणाव आणखी वाढला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

'पाकिस्तान हाय अलर्टवर'

म्हणे, ''पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी ठरला आहे आणि या परिस्थितीची त्यांना जाणीव आहे. आम्ही नेहमीच जगातील सर्व पातळीवर आणि प्रकटीकरणांतून त्याचा निषेध केला आहे," असे तरार यांनी म्हटले आहे.

याआधी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दावा केला होता की, भारत कधीही हल्ला करु शकतो. यामुळे पाकिस्तान हाय अलर्टवर आहे.

पाकिस्तान पूर्णतः सतर्क आहे आणि जर आमच्या जीवाला थेट धोका असेल तरच आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू, अशी दर्पोक्ती आसिफ यांनी व्यक्त केली होती.

पाकिस्तानची उडाली घाबरगुंडी

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा भारताचा निर्धार आहे. जम्मू आणि काश्मीरमधील शांततेला धोका निर्माण करणाऱ्या दहशतवादाविरुद्ध कारवाईची तयारी भारताने केली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत तयारी करत असल्याचे समजते. यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे.

पाकिस्तानची कोंडी

पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे X हँडल भारतात बंद करण्यात आले आहे. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत एक्स अकाऊंटसह त्यांचे संकेतस्थळ भारतात बंद केल्यानंतर हा आणखी एक निर्णय भारताने नुकताच घेतला. त्यामुळे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसीफ यांचे एक्स हँडल भारतात आता दिसणार नाही. त्यांची कोणतीही पोस्टही दिसणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT