Documents Pudhari
राष्ट्रीय

India Mexico trade agreement terms |भारत-मेक्सिको होणार व्यापार मित्र

प्राधान्य व्यापार करारावरील अटी व शर्तीवर स्वाक्षरी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

भारत आणि मेक्सिकोने बुधवारी प्राधान्य व्यापार करारावरील (पीटीए) वाटाघाटींसाठीच्या अटी व शर्तीवर स्वाक्षरी केली. दोन्ही भागीदार राष्ट्रांसाठी नवीन आर्थिक संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने वाटाघाटींसाठी एक चौकट, कराराची व्याप्ती, कार्यपद्धती आणि आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यासाठी हा करारपूर्व आराखडा तयार करण्यात आला आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मते, या स्वाक्षरीमुळे परस्पर फायदेशीर आणि संतुलित 'पीटीए' साठीच्या वाटाघाटींना औपचारिकपणे सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये द्विपक्षीय व्यापार वाढवणे, व्यवसायाच्या संधी निर्माण करणे, गुंतवणुकीचा ओघ वाढवणे आणि लवचीक व वैविध्यपूर्ण पुरवठा साखळींमध्ये योगदान देण्याची क्षमता आहे. या अटी व शर्तीमध्ये वाटाघार्टीच्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. ज्यात वस्तूंसाठी बाजारपेठ प्रवेश, मूळ देशाचे नियम, सीमा शुल्क प्रक्रिया आणि व्यापार सुलभता, विवाद निवारण, स्वच्छता आणि वनस्पती आरोग्यविषयक उपाय, व्यापारातील तांत्रिक अडथळे आणि व्यापारविषयक उपाययोजनांचा समावेश आहे.

प्रस्तावित 'पीटीए'चा उद्देश दोन्ही अर्थव्यवस्थांमधील पूरकतेचा फायदा घेणे व भारतीय बाजारपेठेत मेक्सिकन उत्पादने व व्यवसायांसाठी संधींचा विस्तार करणे हा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिका आणि मेक्सिकोतील सीमेवरून होणाऱ्या स्थलांतरितांच्या मुद्द्यावर मतभेद आहेत. अमेरिकन प्रशासनाने स्थलांतरितांचे लोंढे थांबविण्यासाठी सैन्य तैनात केले. अमेरिकेने मेक्सिको सीमेवरील हालचालींवर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारतासोबतच्या व्यापार वाटाघाटी होत आहेत. मेक्सिकोच्या

'या' क्षेत्रांना होणार फायदा

रसायने, अॅटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्माण, कृषी-अन्न, ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे, वैद्यकीय उपकरणे आणि प्रगत उत्पादन यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी मोठी क्षमता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT