नवी दिल्ली; वृत्तसंस्था : रशियासोबत सुरू असलेल्या युद्धाला तत्काळ पूर्णविराम मिळण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. रशियाला युद्धविरामासाठी भारत विनंती करेल, असा विश्वास झेलेन्स्की यांनी व्यक्त केला आहे.
* झेलेन्स्की - मोदी यांच्यात फोनवर महत्त्वपूर्ण चर्चा
* रशियाला युद्धविरामासाठी भारताच्या मदतीची आशा
* भारताचा शांततापूर्ण चर्चेतून तोडगा काढण्यावर भर
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींसोबतची चर्चा सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, खर्याअर्थाने शांतता कशी प्रस्थापित करता येईल, यावर दोन्ही देशांचे एकमत आहे. झेलेन्स्की यांनी ‘एक्स’वर लिहिले की, भारत रशियाला योग्य तो संदेश देण्यासाठी प्रयत्न करण्यास तयार आहे. शांततेवर अर्थपूर्ण चर्चा करण्याआधी शहरांवरील हल्ले थांबले पाहिजेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यांनी स्पष्ट केले की, भारत सुरुवातीपासूनच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या बाजूने आहे. तणाव कमी करण्यासाठी आणि मानवतावादी द़ृष्टिकोन ठेवण्यासाठी भारताने नेहमीच पुढाकार घेतला आहे. या दिशेने होणार्या सर्व प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा असेल, असे आश्वासन मोदींनी दिले.