114 Rafale jet deal 
राष्ट्रीय

114 Rafale jet deal : 'राफेल'चा व्यवहार: ३.२५ लाख कोटी रुपयांच्या कराराचा प्रस्‍ताव फ्रान्सकडून सादर

या करारात मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर विमानांचे उत्पादन आणि निर्मिती समाविष्ट असणार आहे

पुढारी वृत्तसेवा

114 Rafale jet deal: ११४ राफेल लढाऊ विमानांच्या कराराबाबत एक अत्यंत महत्त्वाची घडामोडी समोर आली आहे. या बहुउद्देशीय लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी फ्रान्सने आपला सविस्तर तांत्रिक आणि व्यावसायिक प्रस्ताव भारताला सादर केला आहे. या करारात मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर विमानांचे उत्पादन आणि निर्मिती समाविष्ट असणार आहे.

भारताने पाठवले होते विनंती पत्र

२०१२ मध्ये एका लांबलेल्या जागतिक स्पर्धेनंतर संरक्षण मंत्रालयाने राफेल विमानांची निवड केली होती. ११४ राफेल बहुउद्देशीय लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी भारताने पाठवलेल्या विनंती पत्राला प्रयुत्तर देत फ्रेंच अधिकाऱ्यांनी आपला प्रस्ताव सादर केला आहे. सध्या संरक्षण मंत्रालयाचा खरेदी विभाग आणि भारतीय हवाई दल या प्रस्तावाचा सखोल अभ्यास करत असल्याचे वृत्त 'एएनआय'ने संरक्षण सूत्रांच्‍या हवाल्‍याने दिले आहे.

भारताच्या मागण्यांचा फ्रेंच प्रस्तावामध्ये समावेशाचा होणार विश्लेषण

करारात 'अस्त्रा' हवाई क्षेपणास्त्रासारख्या भारतीय शस्त्रास्त्रांचे एकत्रीकरण आणि स्वदेशी घटकांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या भारताच्या मागण्यांचा फ्रेंच प्रस्तावामध्ये कसा समावेश करण्यात आला आहे, याचे भारतीय बाजूने बारकाईने विश्लेषण केले जाईल.

११४ पैकी ९४ विमानांची निर्मिती फ्रान्सला

करारांतर्गत ११४ पैकी ९४ विमानांची निर्मिती फ्रान्सला भारतातील स्थानिक भागीदारासोबत करावी लागणार आहे. फ्रेंच कंपनी 'दासू एव्हिएशन'चे सर्व भागीदार क्षेपणास्त्र निर्माता 'एमबीडीए' , इंजिन निर्माता 'सफरान' आणि 'थॅल्स' यांचा समावेश आहे. मिळून हे काम पूर्ण करतील.

मोठ्या प्रमाणावर स्वदेशीकरणाची अपेक्षा

या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वदेशीकरणाची अपेक्षा असून, यामुळे टाटा, लार्सन अँड टुब्रो (L&T) यांसारख्या भारतीय उद्योगांना सुमारे १.६ लाख कोटी रुपयांच्या संधी मिळण्याची शक्यता आहे.भारतीय हवाई दलासाठी ११४ राफेल विमानांच्या या मोठ्या टप्प्याटप्प्यावरील शासकीय करारासाठी (G2G) भारताने चालू वर्षाच्या मे महिन्यात फ्रान्सला विनंती पत्र (LoR) जारी केले होते.रशियन बनावटीची मिग (MiG) लढाऊ विमाने टप्प्याटप्प्याने सेवेतून निवृत्त होत असल्याने आणि 'एलसीए मार्क १ए' व 'एलसीए मार्क २' या स्वदेशी विमानांच्या प्रत्यक्ष समावेशात मोठा विलंब होत असल्याने हवाई दलाच्या स्क्वॉड्रनची घटती संख्या भरून काढण्यासाठी ही विमाने अत्यंत महत्त्वाची आहेत.

राफेलची संख्‍या पोहचणार १७६ वर

भारतीय हवाई दल आणि नौदलाने आधीच ६२ राफेल विमानांची नोंदणी (ऑर्डर) केली असून, ११४ राफेलच्या या नवीन ऑर्डरमुळे ही एकूण संख्या १७६ वर पोहोचेल. शिवाय, सागरी आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय नौदलाने आणखी ३१ विमाने समाविष्ट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, ज्यामुळे देशातील राफेल विमानांची एकूण संख्या २०० च्या पार जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT