India expels Pakistan diplomat ultimatum served to leave country within 24 hours
नवी दिल्ली : भारत सरकारने नवी दिल्लीत पाकिस्तान उच्च आयोगात कार्यरत असलेल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. हा पाकिस्तानी अधिकारी त्याच्या अधिकृत पदाशी सुसंगत नसलेल्या कृतीत सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्या पाक अधिका-याला अयोग्य व्यक्ती (परसोना नॉन ग्रेटा) घोषित केले आहे. त्या अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात पाकिस्तान उच्च आयोगातील चार्ज द अफेअर्स (कार्यवाह राजदूत) यांना मंगळवारी (दि. 13) भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कडक शब्दांत सुनावले. तसेच तक्रार नोंद केली.