Parliament Winter Session File photo
राष्ट्रीय

Lok Sabha Speaker Election : लोकसभा अध्‍यक्षपदासाठी होणार निवडणूक

नंदू लटके

लोकसभा अध्‍यक्षपदासाठी सत्ताधारी भाजप प्रणित एनडीए आघाडी आणि विरोधक इंडिया आघाडीमध्‍ये एकमत झालेले नाही. भाजप प्रणित एनडीएने ओम बिर्ला यांना उमेदवारी दिली आहे, तर इंडिया आघाडीने काँग्रेस खासदार के सुरेश यांना उमेदवारी दिली आहे. त्‍यामुळे आता या पदासाठी निवडणूक हाेणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. लाेकसभा अध्‍यक्षपदासाठी बुधवार, २६ जूनला सकाळी ११ वाजता मतदान हाेणार आहे.

काँग्रेसने ठेवली हाेती 'ही' अट

माध्‍यमांशी बोलताना राहुल गांधी म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. राजनाथ सिंह यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन करून लोकसभा अध्‍यक्षपदासाठी पाठिंबा देण्यास सांगितले. आम्ही राजनाथ सिंह यांना सांगितले आहे की, आम्ही त्याच्‍या लोकसभा अध्‍यक्ष पदाच्‍या उमेदवाराला पाठिंबा देऊ; पण लोकसभा उपाध्‍यक्ष पद विरोधकांकडे गेले पाहिजे.

राजनाथ सिंहांनी केले निवडणूक बिनविरोध करण्‍याचे आवाहन

लोकसभा अध्‍यक्षपद निवडीवर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी आज चर्चा केली. या पदासाठी बिनविरोध निवडून येण्याची परंपरा कायम ठेवली पाहिजे, असे आवाहन त्‍यांनी केले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT