नवी दिल्ली; वृत्तसंस्था : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अफवा, दिशाभूल करणारी माहिती आणि बनावट आशय प्रसारित करणाऱ्या ४०० हून अधिक कथित पाकिस्तानी सोशल मीडिया हँडल्सची ओळख पटविण्यात आली असून, त्यांच्यावर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
दिल्ली पोलिसांचे उपायुक्त (डीसीपी) सुमित झा यांनी गुरुवारी डीओ संदेशात सांगितले की, या सोशल मीडिया खात्यांचा वापर सध्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरविण्यासाठी केला जात आहे. यापैकी अनेक खाती ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानही सक्रिय होती.
‘४०० हून अधिक पाकिस्तानी सोशल मीडिया हँडल्सची ओळख पटली आहे. ही खाती खोटी माहिती आणि अफवा पसरवून जनतेला भडकविण्याचा तसेच युवकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा खात्यांवर कारवाई सुरू असून नागरिकांनी कोणतीही माहिती पडताळणीशिवाय शेअर करू नये.