सरकारने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही विमान कंपनीला प्रवाशांची गैरसोय करू दिली जाणार नाही.
वेळेवर परतावा न देणाऱ्या आणि वारंवार विलंब करणाऱ्या कंपन्यांवर त्वरित कारवाई होणार
सेवा सुधारण्यासाठी इंडिगोच्या १०० हून अधिक विमानांच्या उड्डाणात कपात करण्यात आली आहे.
हा इशारा विमान कंपन्यांना त्यांचे वेळापत्रक अधिक वास्तववादी | बनवण्यासाठी प्रवृत्त करेल.
एअरलाईनच्या दैनंदिन विमानांच्या कपातीनंतर केंद्र सरकारने आता विमान क्षेत्राला सर्वात मोठा आणि कडक इशारा दिला आहे. कोणत्याही स्थितीत प्रवाशांना त्रास देणाऱ्या विमान कंपन्यांना थारा दिला जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. नियमांमध्ये अधिक कडकपणा या कठोर पावलांमागील कारण म्हणजे प्रशासनातील वाढता रोष आहे.
त्यानुसार सध्याच्या आव्हानांच्या नावाखाली ग्राहकांचा अनुभव खराब करणे, हे न्यायसंगत नाही. सरकार आता सर्व विमान कंपन्यांच्या तक्रारी, परिचालन कामगिरी आणि प्रवासी हाताळणीच्या मानकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, प्रवाशांच्या हक्कांना प्राधान्य दिले जाईल आणि सेवा पुरवण्यात अपयशी ठरणाऱ्या कंपन्यांवर त्वरित आणि निर्णायक कारवाई केली जाईल. या नवीन आणि अधिक कठोर भूमिकेमुळे विमान कंपन्यांना त्यांची ग्राहक सेवा आणि परिचालन व्यवस्था मजबूत करावी लागणार आहे.
विलंब रद्द करणे:
विमानांना होणारा मोठा विलंब, अचानक विमाने रद्द करणे, परतावा मिळण्यास होणारा विलंब आणि प्रवाशांप्रती असलेली उदासीनता, या गोष्टी आता खपवून घेतल्या जाणार नाहीत. तातडीची कारवाई अशा प्रकारच्या गैरसोयींवर आता त्वरित नियामक हस्तक्षेप केला जाईल. प्रवाशांचे हित सर्वोच्य : विक्रमी हवाई प्रवासाची मागणी असतानाही कोणत्याही विमान कंपनीला त्यांच्या आर्थिक किंवा परिचालन अडचणींचा भार प्रवाशांबर टाकता येणार नाही
इंडिगोच्या विमान फेऱ्यांत ५ टक्के कपात
नवी दिल्ली: इंडिगो एअरलाईनच्या ऑपरेशनमध्ये दि. १ डिसेंबर २०२५ पासून झालेल्या मोठ्या व्यत्ययांमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मंगळवारी इंडिगोच्या उड्डाण फेऱ्यांत ५ टक्क्यांनी कपात करण्याचे आदेश दिले आहेत. या कपातीचा सर्वाधिक परिणाम जास्त मागणी आणि उच्च वारंवारता असलेल्या मार्गावर होणार आहे.
इंडिगोच्या ५०० विमान फेऱ्या रद्द
इंडिगो एअरलाईनच्या अडचणी आठव्या दिवशीही कायम असून, मंगळवारी जवळपास ५०० विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या. बेंगळुरूतून १२१ फेऱ्या रद्द झाल्या. दिल्लीतून १५२ आणि हैदराबादमधून ५८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. चेन्नई (८१), मुंबई (३१), लखनऊ (२६) आणि अहमदाबाद (१६) येथील सेवांवरही परिणाम झाला.