प्रातिनिधिक छायाचित्र. 
राष्ट्रीय

Income Tax Alert | 'महत्त्वाच्या व्यवहारां'बाबतचे ई-मेल चुकीचे : आयकर विभागाचा खुलासा

Income Tax Alert | करदात्यांनी अशा ई-मेल्सकडे दुर्लक्ष करण्‍याचे केले आवाहन

पुढारी वृत्तसेवा

अनेक करदात्यांनी ई-मेलमधील विसंगतींबाबत तक्रारी केल्या होत्या. काही करदात्यांना महत्त्वपूर्ण व्यवहारांशी संबंधित चुकीचे तपशील असलेले ई-मेल प्राप्त झाले आहेत.

Income Tax Alert

नवी दिल्ली: करनिर्धारण वर्ष २०२६-२७ साठी 'ॲडव्हान्स टॅक्स ई-कॅम्पेन' अंतर्गत पाठवण्यात आलेल्या काही ई-मेल्समध्ये 'महत्त्वाच्या व्यवहारांबाबत' चुकीची माहिती असल्याचे समोर आले आहे, अशी सूचना (दि. १४) आयकर विभागाने जारी केली आहे. करदात्यांनी अशा ई-मेल्सकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन विभागाने केले आहे.

तांत्रिक त्रुटीमुळे गोंधळ

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्‍सवर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये आयकर विभागाने म्‍हटले आहे की, अनेक करदात्यांनी ई-मेलमधील विसंगतींबाबत तक्रारी केल्या होत्या. काही करदात्यांना महत्त्वपूर्ण व्यवहारांशी संबंधित चुकीचे तपशील असलेले ई-मेल प्राप्त झाले आहेत. तांत्रिक सेवा पुरवठादाराच्या माध्यमातून ही त्रुटी दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. करदात्यांना झालेल्या त्रासाबद्दल विभाग दिलगीर आहे," असे विभागाने म्हटले आहे.

विभागाकडून स्पष्टीकरण

विभागाने स्पष्ट केले की, हे ई-मेल केवळ करदात्यांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यास मदत करण्यासाठी आणि 'ॲडव्हान्स टॅक्स'च्या नियमांचे पालन सुलभ व्हावे या उद्देशाने पाठवण्यात आले होते. हे केवळ एक 'रिमाइंडर' होते, मात्र त्यात चुकीचे तपशील गेल्याने गोंधळ निर्माण झाला.

करदात्यांना आयकर विभागाने दिलेल्‍या सूचना

  • करदात्यांनी त्यांच्या व्यवहारांची अचूक माहिती मिळवण्यासाठी आयकर ई-फायलिंग वेबसाइटवरील 'कॉम्प्लायन्स पोर्टल' (Compliance Portal) मधील 'ई-कॅम्पेन' (e-Campaign) टॅबचा वापर करावा.

  • जोपर्यंत ही त्रुटी दूर होत नाही, तोपर्यंत करनिर्धारण वर्ष २०२६-२७ च्या ॲडव्हान्स टॅक्स कॅम्पेन संदर्भातील आधीच्या ई-मेल्सकडे दुर्लक्ष करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT