राष्ट्रीय

पीएम मोदींच्या हस्ते नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचं उद्घाटन

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१९) बिहारमधील नालंदा विद्यापीठ येथील नविन कॅम्पसचे अनावरण केले. . हा कॅम्पस तब्बल १,७०० कोटी रुपयांचा आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच अधिकृत दौरा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१९) बिहारमधील १,७०० कोटी रुपयांच्या नालंदा विद्यापीठ कॅम्पसचे अनावरण केले. नालंदा विद्यापीठ येथील  नविन कॅम्पसचे अनावरण करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  बिहारमधील प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या अवशेषांना भेट दिली. हे अवशेष २०१६ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी हेरिटेज साइट म्हणून घोषित केले होते. नालंदा विद्यापीठाच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,  विद्यापीठ तरुणांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी खूप पुढे जाईल.

नालंदा एक ओळख : नरेंद्र मोदी 

नालंदा नव्या कॅम्पस उद्घाटन दरम्यान बोलत असताना नरेंद्र मोदी म्हणाले, " "मला आनंद आहे की  तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर १० दिवसांत नालंदाला भेट देण्याची संधी मिळाली. नालंदा हे फक्त एक नाव नाही.  ती एक ओळख आणि आदर आहे. नालंदा एक मूल्य आणि मंत्र आहे. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, आग पुस्तके जाळू शकते पण ज्ञान नष्ट करू शकत नाही."

१७ देशांचे विदेशी राजदूतही सहभागी

या उद्धाटन सोहळ्याला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि नालंदा विद्यापीठाचे कुलपती अरविंद पनगरिया उपस्थित होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्रुनेई, दारुसलाम, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाओस, मॉरिशस, म्यानमार, न्यूझीलंड, पोर्तुगाल, सिंगापूर, दक्षिण कोरिया, श्रीलंका आणि व्हिएतनाम यासह एकूण १७ देशांचे विदेशी राजदूतही सहभागी झाले होते.

कसा आहे कॅम्पस?

कॅम्पस दोन शैक्षणिक तुकड्यांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक ४० वर्गखोल्या आणि एकूण आसन क्षमता सुमारे १९०० आहे. यात दोन सभागृहे आहेत, प्रत्येकाची आसन क्षमता ३०० आहे. यात सुमारे ५५० लोकांची क्षमता असलेले विद्यार्थी वसतिगृह आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय केंद्र, २००० लोक बसू शकणारे सभागृह, फॅकल्टी क्लब आणि क्रीडा संकुल यासारख्या अनेक अतिरिक्त सुविधा देखील आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT