IAS Officer Wife Viral Video File Photo
राष्ट्रीय

IAS Officer Wife Viral Video: IAS अधिकाऱ्याची पत्नी असणे किती कठीण असते? एका महिलेने सांगितलं वास्तव; पाहा व्हिडिओ

आयएएस अधिकाऱ्याची पत्नी म्हणजे सुखसोयी आणि ऐश्वर्याने भरलेले आयुष्य, असा अनेकांचा समज असतो. मात्र, याबाबत एका आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीने व्हिडीओद्वारे सांगितलेले वास्तव जाणून घ्या.

पुढारी वृत्तसेवा

IAS Officer Wife Viral Video:

नवी दिल्ली : आयएएस अधिकाऱ्याची पत्नी म्हटले की प्रतिष्ठा, ऐश्वर्य आणि सुखसोयींनी भरलेले आयुष्य, असे अनेकांना वाटते. मात्र, या सुखसोयींच्या आड दडलेला एकटेपणा, त्याग आणि जबाबदाऱ्यांचा भार फार कमी जणांना दिसतो. सण-उत्सवांच्या काळात पती कर्तव्यावर असल्याने घराची सजावट, पूजेची तयारी, मुलांची देखभाल आणि कुटुंबाची जबाबदारी एकट्याने सांभाळावी लागते. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि आयएएस अधिकाऱ्याची पत्नी असलेली चंद्रिका हिने एका व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील याच वास्तव सांगितलं आहे.

‘आयएएस अधिकाऱ्याची पत्नी असणं सोपं नाही’

“आयएएस अधिकाऱ्याची पत्नी आहे, म्हणजे मज्जाच मज्जा असेल,” असे लोक अनेकदा म्हणतात. चला, आज या गोष्टीवर आपणही थोडं हसून घेऊया, अशा शब्दांत चंद्रिकाने आपल्या भावना व्यक्त केल्या. गणपती आणि लक्ष्मीपूजेच्या काळात संपूर्ण कुटुंब एकत्र येते. सर्वजण मिळून जेवतात, घरात आनंदाचे वातावरण असते. मात्र, याच काळात तिचे पती नाशिकबाहेर कर्तव्यावर होते. त्यामुळे घराची सजावट करण्यापासून ते पूजेच्या तयारीपर्यंतची सर्व कामे तिला एकटीलाच करावी लागली, असे तिने सांगितले.

आलिशान गोष्टींच्या पलीकडे जाऊन तो एकाकीपणा...

आयएएस अधिकाऱ्याची पत्नी असल्यामुळे आपल्याकडे भरपूर सुखसोयी असतील, असे लोकांना वाटते. या गोष्टीला नकार देण्याचे कारण नाही; सुखसोयी आहेतच. मात्र, लोक जेव्हा ऐश्वर्याची गणिते मांडतात, तेव्हा त्यामागे कराव्या लागणाऱ्या त्यागाचा विचार कोण करतो, असा सवाल चंद्रिकाने उपस्थित केला. “लोक माझा मोठा बंगला पाहून ‘वा मॅडम, किती मोठं घर आहे’ असे म्हणतात. पण त्या मोठ्या घरात पसरणारी शांतता आणि एकटेपणा काय असतो, हे फक्त मलाच माहीत आहे,” असे तिने म्हटले.

सणासुदीच्या काळात जेव्हा तुमचं कुटुंब एकत्र बसून जेवण करत, तेव्हा माझ्या घरी माझ्या पतीसाठी एक ताट वेगळे काढून झाकून ठेवलेले असते. कारण त्यांच्या परतण्याची कोणतीही निश्चित वेळ नसते. सणासुदीच्या खरेदीची सर्व जबाबदारी मला एकटीलाच सांभाळावी लागते. संध्याकाळच्या वेळी जेव्हा ते पूर्णपणे थकून घरी परततात, तेव्हा फोटो काढण्यासाठी आवश्यक असलेला चांगला नैसर्गिक प्रकाश केव्हाच मावळलेला असतो.

चेहऱ्यावर हास्य, मनात मात्र अपूर्णतेची जाणीव

मनात खोल एकटेपणा असूनही, आम्हाला चेहऱ्यावर हास्य टिकवून ठेवावे लागते, जेणेकरून घरातील वातावरण उत्साही आणि चैतन्यमय राहील. तुमच्याकडे जगातील सर्व सुखसोयी असू शकतात, परंतु सणासुदीच्या दिवशी जेव्हा ती एक खास व्यक्ती तुमच्यासोबत नसते, तेव्हा प्रत्येक रंग अपूर्ण वाटू लागतो. हे खरोखरच कठीण असते, तरीही आम्ही आयएएस अधिकाऱ्यांच्या पत्नी प्रत्येक आव्हानाचा सामना हसतमुखाने करायला शिकतो. लोकांचे लक्ष आमच्याकडे असलेल्या गोष्टींवर लगेच जाते, पण त्या मिळवण्यासाठी आम्ही मागे काय काय सोडले आहे, हे कोणालाच दिसत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT