राष्ट्रीय

पती नको, पण मोबाईल हवाच! वर्षभरातच तुटले लग्न

मोहन कारंडे

लखनौ : मोबाईलमुळे वैवाहिक संबंध बिघडत असल्याच्याही अनेक घटना पुढे येतात. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये नुकतेच घडले. तिथे केवळ मोबाईलमुळे वर्षभरातच लग्न तुटले आहे. संबंधित जोडप्याला पोलिसांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, महिला म्हणाली, 'मी पतीला सोडू शकते; पण मोबाईल नाही.' पंचायत झाल्यानंतर दोघे विभक्त झाले.

गजपतपूर येथे राहणार्‍या अनिता हिचा रमाकांतसोबत 10 जून 2021 रोजी विवाह झाला होता. रमाकांत गुजरातमध्ये खासगी नोकरी करतो. पंधरा दिवसांपूर्वी रमाकांत घरी आला असता अनिताही तिच्या माहेरून सासरी परतली होती. ती नेहमी मोबाईलमध्ये व्यस्त असायची. कधी ती कोणाशी तरी बोलत राहायची, तर कधी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटस्अ‍ॅपवर व्यस्त असायची. नंतर मोबाईलवरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यामुळे अनिताने कासीमाबाद पोलिस ठाणे गाठले आणि पतीवर मारहाणीचा आरोप केला. पोलिसांनी पतीला ठाण्यात बोलावले. दोघांच्या नातेवाईकांनीही पोलिस ठाणे गाठले. तिथे पोलिसांनी विवाहितेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. तिने स्पष्टपणे सांगितले की, मोबाईलशिवाय आपण राहू शकत नाही.

SCROLL FOR NEXT