Hyderabad software engineer death file photo
राष्ट्रीय

Crime News: इंजिनिअर तरुणीचे धक्कादायक कृत्य; निर्वस्त्र मंदिरात गेली अन् देवीची मूर्ती घेऊन तलावात उडी मारली, कारण काय?

Hyderabad software engineer death: सॉफ्टवेअर अभियंता तरूणी निर्वस्त्र अवस्थेत मंदिरात गेली, तेथून देवी अम्मावारूची मूर्ती सोबत घेतली आणि तलावात उडी मारून जीवन संपवले.

पुढारी वृत्तसेवा

Hyderabad software engineer death

हैदराबाद: हैदराबाद येथील पीरजादीगुडा परिसरातील सॉफ्टवेअर अभियंता तरूणी निर्वस्त्र अवस्थेत मंदिरात गेली, तेथून देवी अम्मावारूची मूर्ती सोबत घेतली आणि तलावात उडी मारून जीवन संपवले. या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला, मात्र तरुणीने सोबत नेलेली देवीची मूर्ती अद्याप बेपत्ता असून, पोलीस तलावात तिचा शोध घेत आहेत.

निर्वस्त्र होऊन मंदिरात प्रवेश अन् तलावात उडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी असे मृत सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचे नाव आहे. तिने अचानक आपले कपडे काढून जवळच्याच एका मंदिरात विवस्त्र अवस्थेत प्रवेश केला. तिथली 'अम्मावारू' देवीची मूर्ती उचलून ती थेट जवळच्या तलावाकडे गेली आणि तिने मूर्तीसह पाण्यात उडी घेतली. काही वेळातच तिचा बुडून मृत्यू झाला. आपत्ती प्रतिसाद दलाने बोटींच्या साहाय्याने तलावात शोधमोहीम राबवून तेजस्विनीचा मृतदेह बाहेर काढला. मात्र, ती घेऊन गेलेली देवीची मूर्ती अजूनही सापडलेली नाही.

महिन्याला १ लाख रुपये भाडे आणि लॉजचे कनेक्शन?

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती काही धक्कादायक माहिती लागली आहे. तेजस्विनी एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती, ज्यासाठी ती दररोज तब्बल ३,५०० रुपये म्हणजेच महिन्याला सुमारे १ लाख रुपये भाडे देत होती. विशेष म्हणजे, ती राहत असलेल्या इमारतीचे वरचे दोन मजले अनधिकृतपणे लॉजसारखे चालवले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या लॉज व्यवसायाचा आणि तेजस्विनीच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, यादृष्टीने आता पोलीस तपास करत आहेत.

तलावात देवीच्या मूर्तीचा शोध

या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा म्हणून देवी अम्मावारूची मूर्ती मानली जात आहे. त्यामुळे आपत्ती प्रतिसाद पथकाने तलावात शोधमोहीम सुरू केली आहे. बोटींच्या सहाय्याने शोध घेतला जात असून, मूर्ती सापडल्यास घटनाक्रम स्पष्ट होण्यास मदत होईल, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी या प्रकरणी तेजस्विनीची आई अरुणा यांची चौकशी केली असून त्यांची जबानी नोंदवून घेतली आहे. तसेच, तेजस्विनीचे गेल्या काही दिवसांतील आर्थिक व्यवहार पोलीस तपासत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे पोलिसांनी सांगितले असले, तरी तिने हे टोकाचे पाऊल का उचलले आणि त्यामागील नेमका हेतू काय होता, हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि फॉरेन्सिक पुराव्यांचे विश्लेषण करत असून, तपासाअंतीच या गूढ मृत्यूमागचे खरे कारण समोर येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT