विषारी साप जरी मोठा असला किंवा त्याचे पिल्ले त्याच्याशी खेळ करणे जिवावर बेतू शकते हे एक घटनेतून समोर आले आहे. हैदराबाद मधून एक प्रकार समोर आला आहे. यामध्ये हैदराबादमधील एका ३० वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी, १९ जून रोजी मोइनाबाद येथील त्या व्यावायिकाच्या फार्महाऊसवर घडली.
याबबत अधिक माहिती अशी की एका विषारी सापाला हाताळण्याचा प्रयत्न करत असताना दंश झाल्यामुळे व्यावसाईकाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तिचे नाव सय्यद मोईनुद्दीन हुसैनी असे असून तो बाबरी हिल्स येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना विकाराबाद जिल्ह्यातील मोईनाबाद येथे असलेल्या त्यांच्या खाजगी फार्महाऊसवर घडली.
या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. यामध्ये सय्यद एका छोट्या विषारी सापाच्या पिल्लाला हाताळताना दिसत आहे. ते नागाचे पिल्लू होते अशी माहिती समोर आले आहे. त्यामधे त्याचे सहकारी साप पकडल्याचे कौतूक करत असतात. तो सहकाऱ्यांच्या अंगावर साप टाकू असे म्हणताना दिसतो तेवढयाते ते सापचे पिलू हाताच्या अंगठ्याला दंश करते. फार्महाऊसवर मोईनुद्दीन आपल्या मित्रांसोबत वेळ घालवत असतानाच तिथे एक लहान साप आला. त्याला पकडून खेळ करत असतानाचा त्याचा दंश झाला.
दंश झाल्यानंतर सय्यद मोईनुद्दीन साप चावला चावला असे ओरडतो. सर्पदंश झाल्यानंतर त्याच्या मित्रानी त्याला तात्काळ रुग्णालयत दाखल केले मात्र, विषाच्या प्रभावामुळे त्याची प्रकृती वेगाने खालावली आणि आवश्यक वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती समोर आली आहे. जरी विषारी साप लहान असला तरी त्याच्यामध्ये विषाचे प्रमाण एका माणसाला सहज मारु शकते असे सर्पतज्ञ सांगतात.