8th Pay Commission Update Pudhari
राष्ट्रीय

8th Pay Commission Update | आठव्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? काय आहे Fitment Factor? जाणून घ्या नवा हिशोब

8th Pay Commission Update | 49 लाख कर्मचारी, 65 लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी

Akshay Nirmale

8th Pay Commission Update what is Fitment Factor? How much will the salaries of employees increase ?

नवी दिल्ली : केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा जानेवारी 2025 मध्ये केली होती. हा आयोग केंद्र सरकारच्या सुमारे 49 लाख कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख पेन्शनधारकांना लाभ देणारा आहे.

आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप आयोगाची औपचारिक स्थापना न झाल्यामुळे अंमलबजावणीच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Fitment Factor म्हणजे काय?

फिटमेंट फॅक्टर हा घटक केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये वाढ करताना वापरला जाणारे एक महत्वाचे गुणोत्तर (multiplying factor) आहे. वेतन आयोग जेव्हा लागू केला जातो, तेव्हा कर्मचाऱ्याचे मूळ वेतन (Basic Pay) या गुणोत्तराने गुणिले (multiply) करून नवीन वेतन निश्चित केले जाते.

उदाहरणार्थ जर तुमचं सध्याचं मूळ वेतन रु.20,000 असेल आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 असेल (जसे 7व्या वेतन आयोगात होतं), तर नवीन वेतन होईल: रु. 20,000 x 2.57 = रु. 51,400

फिटमेंट फॅक्टर का महत्वाचा आहे?

  • पगाराच्या नव्या रचनेची गणना यावर आधारित असते

  • पेन्शन, DA, HRA यासारख्या इतर भत्त्यांवर थेट परिणाम होतो

  • कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांनाही याचा फायदा मिळतो

मुख्य ठळक बाबी

  • घोषणा: 17 जानेवारी 2025

  • प्रस्तावित अंमलबजावणी: 1 जानेवारी 2026

  • मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही समिती अधिकृतपणे स्थापन झालेली नाही

लाभार्थी:

  • सुमारे 49 लाख केंद्र सरकारी कर्मचारी

  • सुमारे 65 लाख निवृत्त कर्मचारी (पेन्शनधारक)

8व्या वेतन आयोगासाठी वेतनवाढीचा अंदाज

फिटमेंट फॅक्टर: 2.6 ते 2.85 दरम्यान असण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मूळ वेतनात 25 टक्के ते ते 30 टक्के वाढ अपेक्षित आहे.

उदाहरणार्थ- सध्याचे मूळ वेतन रु. 20,000 असणाऱ्याचे वेतन रु. 46,600 ते ₹57,200 पर्यंत जाऊ शकते

किमान पेन्शन: रु.9000 वरून वाढून रु.22,500 ते रु.25,200 दरम्यान होण्याची शक्यता

इतर योगदान आणि परिणाम

NPS (नॅशनल पेन्शन सिस्टिम): मूळ वेतन आणि डीए वाढल्यामुळे कर्मचारी व सरकारच्या योगदानामध्ये वाढ

CGHS (केंद्रीय आरोग्य योजना): मासिक शुल्क नव्या वेतनानुसार बदलण्याची शक्यता

भत्त्यांमध्ये वाढ: DA, HRA व TA यामध्ये प्रमाणानुसार वाढ अपेक्षित

विलंबाची शक्यता, कर्मचारी वर्गात चिंता

वर्तमान घडामोडींनुसार, आयोगाची रचना अद्याप झालेली नाही, यामुळे 2026 पासून अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. फिटमेंट फॅक्टरचा हिशोब वेतन आयोगाच्या अहवालावर अवलंबून असल्याने विलंबामुळे प्रत्यक्ष लाभ लांबणीवर जाऊ शकतो.

यापुर्वीचा फिटमेंट फॅक्टर

वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर अंमलबजावणी वर्ष

5वा आयोग 1.86 1996

6वा आयोग 1.86 2006

7वा आयोग 2.57 2016

8वा आयोग 2.6–2.85 (अपेक्षित) 2026 (नियोजित)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT