प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
राष्ट्रीय

विमानात 'बॉम्‍ब'च्‍या अफवा झाल्‍या उदंड! केंद्र सरकार उचलणार 'हे' पाऊल

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : "विमानात बॉम्‍ब ठेवला आहे," अशा अफवांचे पीक आले आहे. देशातील विविध ठिकाणी मागील ४८ तासांमध्‍ये तब्‍बल १० विमान प्रवाशांना या अफवांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने या घटनांची गंभीर दखल घेतली असून, आता विमानात स्‍काय मार्शलची संख्‍या वाढविण्‍याचा विचार सुरु आहे. (Hoax bomb threats to flights) या प्रश्‍नी

विमानांमध्ये स्‍काय मार्शलची संख्या दुप्पट करण्‍याचा विचार

याबाबत 'इंडिया टूडे'ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, अलीकडेच काही एअरलाइन्सकडून मिळालेल्या फसव्या बॉम्बच्या धमक्या लक्षात घेऊन सरकार अनेक पावले उचलण्याचा विचार करत आहे. यामध्‍ये विमानात स्‍काय मार्शलची संख्या वाढवणे समाविष्ट आहे. आज (दि.१६) नागरी उड्डाण सुरक्षा विभाग आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. सध्‍या नागरी उड्डाण मंत्रालय "नो-फ्लाय लिस्ट" अपडेट करण्यासाठी अफवा पसरविणार्‍यांना ओळखण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांसोबत काम करत आहे. विमान कंपन्‍यांना धमकी देणार्‍यांना नो-फ्लाय लिस्टमध्ये समाविष्ट करण्‍यात येणार आहे. तसेच गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर विमानांमध्ये स्‍काय मार्शलची संख्या दुप्पट करण्याबाबत निर्णय घेण्‍यात येणार आहे." (Hoax bomb threats to flights)

स्काय मार्शल म्हणजे काय?

दहशतवादविरोधी आणि अपहरण प्रतिबंध उपायांतील तज्ञ असलेले राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) चे एक युनिट मुख्यतः आंतरराष्ट्रीय मार्गांवर आणि काही संवेदनशील देशांतर्गत मार्गांवर तैनात केले जाते. स्काय मार्शल हे सशस्त्र साध्या वेशातील सुरक्षा अधिकारी असतात. ते प्रवासी विमानातून प्रवास करतात. कंदहारमध्ये एअर इंडियाच्या फ्लाइट IC 814 चे अपहरण झाले होते. यानंतर भविष्यात होणारे विमान अपहरण टाळण्यासाठी 1999 मध्ये भारतात स्काय मार्शल किंवा फ्लाइट मार्शल संवदेनशील आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय हवाई मार्गावर तैनात केले जावू लागले.

मागील ४८ तासांमध्‍ये १० विमानांना बॉम्‍बच्‍या ठेवल्‍याच्‍या धमक्‍या 

मागील ४८ तासांमध्‍ये एकूण १० विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. अशा धमक्यांना गांभीर्याने घेत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत विमान वाहतुकीशी संबंधित सुरक्षा यंत्रणाही सहभागी झाल्या होत्या. ज्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अशा धमक्या देण्यात आल्या होत्या, त्यांचीही चौकशी केली जात आहे. ज्या सोशल मीडिया अकाउंटवरून धमक्या पाठवण्यात आल्या आहेत, ते ब्रिटनसह इतर अनेक देशांमध्ये सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी एकूण सात विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या, तर बुधवारी इंडिगो आणि आकाशाच्या विमानांना अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्याचवेळी सोमवारीही विमानात बॉम्बची धमकी देण्यात आली होती. (Hoax bomb threats to flights)

बोगस कॉल आणि धमक्‍या देणार्‍यांना किती शिक्षा होवू शकते?

बॉम्बच्या धमक्या देणे आणि बनावट फोन कॉल करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. अशा प्रकरणात खोट्या धमक्या देणाऱ्या किंवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. यासोबतच अशा प्रकरणांमध्ये मोठा दंडही होऊ शकतो. केलेला गुन्हा अधिक गंभीर असेल आण गुन्हेगार दोषी आढळल्यास बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. (Hoax bomb threats to flights)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT