राष्ट्रीय

कोरोना : महाराष्ट्रात सर्वाधिक ‘डेल्टा व्हेरियंट’ची नोंद

Pudhari News

नवी दिल्ली : सुमेध बनसोड 

देशातील कोरोना महारोगराईची दुसरी लाट ओसरत असताना संसर्गाच्या नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. देशात कोरोना संबंधी आतापर्यंत करण्यात आलेल्या जीनोम सिक्वेसिंगनुसार दर दुसऱ्या नमुण्यांमध्ये गंभीर व्हेरियंट आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयानूसार आतापर्यंत ४५ हजार नमुण्यांची तपासणी करण्यात आले. यातील २१ हजारांहून अ​धिक नमुण्यांमध्ये गंभीर व्हेरियंट आढळले. दर दुसर्या नमुण्यांच्या सिक्वेसिंगमध्ये अल्फा, बीटा, डेल्टा, डेल्टा प्लस सारखे व्हेरियंट आढळल्याने देशात कोरोनाचे नवे रूप वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. अल्फाच्या तुलनेत डेल्टा व्हेरियंट चार पटीने वेगाने पसरत आहे. महाराष्ट्रातून घेण्यात आलेल्या नमुण्यांपैकी २ हजार ९६८ नमुण्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळला आहे. 

डिसेंबर २०२० ते मे २०२१ दरम्यान १०.३१ टक्के नमुण्यांमध्ये कोरोनाचे गंभीर व्हेरियंट आढळले होते. हैद्राबाद येथील पेशी आणि रेणू जीवशास्त्र केंद्राचे माजी संचालक डॉ. राकेश मिश्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या लाटेत अल्फा व्हेरियंट सर्वाधिक आढळून आला. डिसेंबर २०२० पासून देशात जीनोम सिक्वेसिंग सुरू करण्यात आली. दुस-या लाटे दरम्यान डेल्टा व्हेरियंट सर्वाधिक आढळला. दुसरी लाट ओसरताच डेल्टा प्लस तसेच एव्हाय २.० म्यूटेशन आढळत आहे. आकडेवारीनूसार आतापर्यंत ४५ हजारांपैकी ४ हजार ५४४ नमुण्यांमध्ये अल्फा, २६६ मध्ये बीटा तसेच १६ हजार २९७ नमुण्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट मिळाले आहेत. तर, जानेवारी, २०२१ मध्ये केवळ दोन नमुण्यांमध्ये गामा व्हेरियंट आढळला.

आठवड्याभरात एव्हाय २.० व्हेरियंटचे १४ रुग्ण

डेल्टा व्हेरियंटमध्ये मध्ये डेल्टा प्लस तसचे एव्हाय २.० हे दोन म्युटेशन आहे. आतापर्यंत देशातील डेल्टा प्लसचे ५६ रूग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत एव्हाय २.० चे केवळ दोनच रूग्ण आढळले होते. पंरतु, गेल्या सात दिवसांत १४ रूग्ण आढळले आहेत. राजस्थान, महाराष्ट्र तसेच कर्नाटकमध्ये हे रूग्ण आहेत. डेल्टा प्लस तसेच एव्हाय २.० संबंधी संशोधकांना अद्याप जास्त माहिती उपलब्ध नाही. अमेरिकेत यापूर्वी एव्हाय २.० म्यूटेशन आढळले होते. 

या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक घातक व्हेरियंट 

    राज्य    गंभीर व्हेरियंट रूग्ण    अल्फा     डेल्टा  

१) महाराष्ट्र       ३,११७          १३९      २,९६८

२) दिल्ली         २,९७३          ५९४      २,२६१

३) केरळ          २,३८२          ६३७       १,६७९

४) प.बंगाल       १,५५३         १२८        १,३९७

५) पंजाब          १,४३८          ८३८        ५९१

कोविशिल्ड आणि ग्रीन पास, काय आहे प्रकरण?

गंगेत आढळलेल्या मृतदेह तपासाची याचिका फेटाळली

 'ट्विटर' चा खाेडसाळपणा, नकाशात दाखवले जम्मू-काश्मीर आणि लडाख वेगळे देश

मोठा निर्णय! आरोग्य विभागासाठी ५० हजार कोटींची घोषणा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT