रांची : झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी बुधवारी राजीनामा दिला. झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्वेसर्वा हेमंत सोरेन यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. 7 जुलै रोजी हेमंत यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. ‘झामुमो’ आणि मित्रपक्षांच्या आमदारांमध्ये हेमंत यांना मुख्यमंत्री करण्यासंदर्भात सहमती झाली. त्यानंतर आमदारांच्या बैठकीत हेमंत यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा दिला. हेमंत सोरेन झारखंडचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.