Indian blogger Jyoti Malhotra  Pudhari
राष्ट्रीय

Indian blogger spy Pakistan: महिला ट्रॅव्हल ब्लॉगरचे पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यासोबत अनैतिक संबंध? पाकसाठी केली हेरगिरी...

Indian blogger spy Pakistan: दोनवेळा पाकिस्तान दौऱ्यावर गेली, हेर बनली; व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्रामवरून माहिती लीक, सोशल मीडियावरून भारतविरोधी प्रचाराचा कट उघड

पुढारी वृत्तसेवा

Indian Travel blogger Jyoti Malhotra arrested for spying for Pakistan

नवी दिल्ली : हरियाणातील हिसार येथील ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रा हिला हेरगिरी आणि पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकार्‍यांना संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामावर सहमती दिल्यानंतर या आठवड्यात हरियाणातून झालेली ही तिसरी अटक आहे.

तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्योतीचे एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकार्‍याशी अनैतिक संबंध होते. आणि दोघांनी परदेशात विविध ठिकाणी एकत्र प्रवासही केला होता.

पाच दिवसांची पोलीस कोठडी

हिसार पोलिसांनी सांगितले की, ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली असून पोलिस तिची चौकशी करत आहेत.

तिच्याविरुद्ध अधिकृत गोपनीयता अधिनियम, 1923 मधील कलम 3 आणि 5 तसेच भारतीय न्याय संहिता अधिनियमातील कलम 152 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

दिल्लीत पाकिस्तानी अधिकाऱ्याला भेटली

हिसार सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक संजय यांच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आली. एफआयआरनुसार, ज्योतीने 2023 मध्ये दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाला भेट दिली होती, जिथे तिची भेट एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिश या कर्मचाऱ्याशी झाली.

2023 मध्ये केला पाकिस्तान दौरा

एफआयआरमध्ये म्हटले आहे, “त्या महिलेने कबूल केले की ती एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिशच्या संपर्कात राहिली आणि 2023 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यादरम्यान तिने अली एहवान याची भेट घेतली.

त्याने तिच्या पाकिस्तानमधील वास्तव्य आणि प्रवासाची व्यवस्था केली. अलीने तिला पाकिस्तानच्या सुरक्षा आणि गुप्तचर अधिकार्‍यांशी ओळख करून दिली, जिथे तिची शाकीर आणि राणा शहबाज यांच्याशीही भेट झाली.”

शाकीरचं नाव जट्ट रंधावा असे सेव्ह केले...

एफआयआरमध्ये पुढे म्हटले आहे की, “त्या महिलेनं शाकीरचं नाव ‘जट्ट रंधावा’ असं सेव्ह केलं होतं, जेणेकरून कुणालाही शंका येणार नाही. 2023 मध्ये पाकिस्तानहून परत आल्यानंतर ती व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटसारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मवरून त्यांच्याशी संपर्कात राहिली.”

दोन वेळी पाकिस्तान दौरा

2023 मध्ये ज्योती मल्होत्रा दोनदा पाकिस्तानला गेली होती. तिचं “Travel with Jo” नावाचं यूट्यूब चॅनल होतं. ती हरियाणा आणि पंजाबमध्ये कार्यरत असलेल्या एका गुप्त नेटवर्कचा भाग होती, ज्यामध्ये एजंट, आर्थिक पुरवठादार आणि माहिती पुरवणारे कार्यरत होते.

दानिश, जो सध्या भारत सरकारने persona non grata घोषित करून 13 मे 2025 रोजी देशातून हाकलून दिला आहे, त्याने ज्योतीची ओळख अनेक पाकिस्तानी गुप्तचर अधिकार्‍यांशी करून दिली होती.

गुप्तचर अधिकाऱ्यांशी अनैतिक संबंध...

ज्योतीने भारतातील संवेदनशील ठिकाणांची माहिती शेअर केल्याचा आरोप आहे आणि सोशल मीडियावर पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा दाखवण्याचे कामही ती करत होती.

तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तिचं एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकार्‍याशी अनैतिक संबंध होते, असे सांगितले जात आहे.

तसेच त्या दोघांनी बाली, इंडोनेशियालाही एकत्र प्रवास केला होता. दिल्लीतील दानिशच्या वास्तव्यादरम्यान ती सतत त्याच्याशी समन्वय साधत होती, ज्यामुळे तिच्यावर आणखी संशय वाढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT