पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड अखरे गजाआड X Photo
राष्ट्रीय

पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड अखेर जेरबंद

HarpreetSingh Arrested | कुख्यात गुंड हरप्रीत सिंगला अमेरिकेत अटक

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: HarpreetSingh Arrested | पंजाबवर अनेकवेळा दहशतवादी हल्ले करणारा कुख्यात गुंड हरप्रीत सिंग याला अखेर FBIने (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) अमेरिकेत अटक केली आहे. दहशतवादी संबंधांसाठी एनआयएने सिंग यांच्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. त्याने २०२५ च्या अमृतसर बॉम्बस्फोटाची योजना आखल्याचा तसेच अनेक धमक्या दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

वृत्तात म्हटले आहे की, भारतातील मोस्ट वॉन्टेड गँगस्टार हॅपी पसियाला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. हॅप्पी पासियाचे खरे नाव हरप्रीत सिंग आहे. अटकेनंतर अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयने त्याचा फोटो प्रसिद्ध केला आहे. या चित्रात त्याची लांब दाढी आहे आणि कपाळावर पंजाबी पगडी आहे. तो पंजाबमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड आहे. अलिकडेच पंजाबमधील ग्रेनेड हल्ल्यात त्याचे नाव पुढे आले.

हॅपी पसियावर होते ५ लाखांचे बक्षिस 

मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंट तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर भारताला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. हॅपी पसियाची अटक ही भारतासाठी मोठी गोष्ट आहे. तो पंजाबमधील अनेक ग्रेनेड हल्ल्यांचा मास्टरमाइंड आहे. त्याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस आहे. दहशतवादी हॅपी पसियाला अमेरिकेत आयसीई आणि एफबीआयने अटक केली. तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि खलिस्तानी दहशतवादी रिंदा आणि बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित होता. पंजाबमध्ये अनेक दहशतवादी घटना घडवून आणण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. पंजाबमध्ये अलिकडेच झालेल्या ग्रेनेड हल्ल्यांमागेही हॅपी पसियाचा हात असल्याचे म्हटले जाते.

अमेरिकन गुप्तचर संस्थेने फोटो पोस्ट करत दिली माहिती

अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयने कुख्यात गुंड हरप्रीत सिंगचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले आहे की, 'आज सॅक्रामेंटोमध्ये, एफबीआय आणि ईआरओने पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या कथित दहशतवादी हरप्रीत सिंगला अटक केली. दोन आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांशी संबंधित असलेल्या या व्यक्तीने अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. पकडले जाऊ नये म्हणून तो बर्नर फोन वापरत होता.”

अमेरिकन गुप्तचर संस्थेने फोटो पोस्ट करत दिली माहिती

अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयने कुख्यात गुंड हरप्रीत सिंगचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले आहे की, 'आज सॅक्रामेंटोमध्ये, एफबीआय आणि ईआरओने पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या कथित दहशतवादी हरप्रीत सिंगला अटक केली. दोन आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांशी संबंधित असलेल्या या व्यक्तीने अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. पकडले जाऊ नये म्हणून तो बर्नर फोन वापरत होता.”

कोण आहे 'हॅपी पासिया' ?

हॅपी पासिया हा खलिस्तानी दहशतवादी आहे. तो पंजाबच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी सर्वात मोठा धोका राहिला. तो अमेरिकेत लपून बसला होता. पण परदेशातून त्याचे लक्ष्य पंजाब आणि पंजाब पोलिस होते. दहशतवादी हॅपी पसिया हा खलिस्तानी दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलचा कमांडर आहे. एवढेच नाही तर तो पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचा आयएसआयचा विश्वासू प्यादा देखील बनल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT