पुढारी ऑनलाईन डेस्क :
Hanuman Jayanti 2025 : असे मानले जाते की बजरंगबली अजूनही पृथ्वीवर भौतिक स्वरूपात उपस्थित आहेत. हनुमान जन्मोत्सव हा हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी सर्वात शुभ प्रसंग मानला जातो. दरवर्षी चैत्र शुक्ल पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. (hanuman jayanti 2025)
आज हनुमान जयंतीचा उत्सव सर्व भारतभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हिंदू धर्मात हनुमानाच्या पूजेला सर्वात पवित्र आणि प्रभावशाली मानण्यात आले आहे. भक्तांमध्ये अशी मान्यता आहे की, संकटमोचन हनुमानाची रोज उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्वात मोठे कष्टही दूर होतात.
हनुमानाला अष्ट सिद्धी आणि नऊ निधी प्राप्त आहेत. ते आपल्या भक्तांच्या जीवनातील सर्व प्रकारच्या बाधा दूर करून सुख-शांती प्रदान करतात. शास्त्रांमध्ये त्यांना ऊर्जा, शक्ती, ज्ञान, भक्ती आणि ताकदीचे प्रतीक सांगितले आहे. हनुमान हे प्रभू श्रीरामाचे परम भक्त आहेत. त्यामुळे त्यांची पूजा केल्याने श्रीरामाचा आशीर्वादही प्राप्त होतो.
आजच्या दिवशी हनुमानजींना प्रसन्न करून त्यांच्याकडून कृपाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. सकाळी लवकर उठून स्नान करून ध्यान केल्यानंतर लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे. यानंतर हनुमानजींची विधिपूर्वक पूजन करावे.
दुपारी ११:३० वाजल्यापासून १२:३० वाजेपर्यंत हनुमानजींना लाडू आणि तुळस अर्पण करा. असे केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात अशी भक्तांची धारणा आहे.
पहिल्यांदा श्रीरामाचे ध्याने करत "श्री रामचंद्र कृपालु भज मन, हरण भव भय दारुणम्" या मंत्राचा जाप करावा. यानंतर "राम राम" मत्राचा जप करावा. यानंतर ११ वेळा हनुमान चालीसेचे पठण करून मनोकामना पूर्तीची प्रार्थना करावी अशी श्रद्धा आहे.
शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की, "जो कोणी हे शंभर वेळा पठण करेल, तो बंधनातून मुक्त होईल आणि त्याला खूप आनंद मिळेल." याचा अर्थ असा की जो व्यक्ती हे स्तोत्र १०० वेळा पठण करतो तो सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्त होतो आणि अत्यंत आनंदी होतो. जर तुम्ही एकाच वेळी १०० वेळा पाठ करू शकत नसाल तर तुम्ही प्रत्येकी १० वेळा हनुमान चालीसा पठण करू शकता.
हनुमान जन्मोत्सव हा हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी सर्वात शुभ प्रसंग मानला जातो. दरवर्षी चैत्र शुक्ल पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. असे मानले जाते की बजरंगबली अजूनही पृथ्वीवर भौतिक स्वरूपात उपस्थित आहेत. म्हणून, त्यांचे भक्त या दिवशी विशेष उपाय करतात, जेणेकरून हनुमानजींचे आशीर्वाद आयुष्यभर राहतील.