Pakistan Hangor Submarine Deployment:
पाकिस्तान आपल्या नौसेनेची ताकद वाढवायला सुरूवात केली आहे. हिंदी महासागरात आपला प्रभाव आणि विस्तार वाढवण्यासाठी पाकिस्तान एका योजनेवर काम करत आहेत. पाकिस्तानने नुकतेच चिनी बनावटाची हंगोर क्लास पाणबुडी आपल्या ताफ्यात सामील केली आहे. आता पाकिस्तानी नौसेनेची अधिकारी ही पाणबुडी बंगालच्या उपसागरात तैनात करण्याची भाषा करत आहेत.
१९७१ मध्ये बांगलादेशच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तान या क्षेत्रात आपल्या नौसेनेची उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ही भारतीय सुरक्षेच्या दृष्टीकोणातून आणि पश्चिम बंगालच्या उपसागरावरील आपला डॉमिनन्स कायम ठेवण्याच्या दृष्टीकोणातून चिंतेची बाब आहे.
पाकिस्तान योजनेनुसार एकूण आठ हंगोर क्लास पाणबुड्या आपल्या ताफ्यात सामील करणार आहे. ते आपल्या जुन्या अगोस्टा पाणबुड्या रिटायर करणार आहे. एप्रिलमध्ये चीनमध्ये कमीशन केली गेलेली पाणबुडी पीएनएस हंगोर ही आता कराचीमध्ये पोहचली आहे.
चीनची निर्मिती असलेली ही पाणबुडी एअर इंडिपेंडेट प्रोपल्शन (AIP) या तंत्रज्ञानावर चालते. त्यामुळे ती पारंपरिक पाणबुडीपेक्षा जास्त काळ पाण्याच्या आत राहू शकते. तसेच ही पाणबुडी रडारवर ट्रॅक होणे अवघड असते.
हंगोर नावाचे पाकिस्तानसाठी एक ऐतिहासिक आणि प्रतिकात्मक महत्व आहे.१९७१ मध्ये भारत पाकिस्तान युद्धानंतर खरी पीएनएस हंगोरने अरबी समुद्रात भारतीय युद्धनौका आयएनएस खुखरीला बुडवलं होतं. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेचे कोणती तरी युद्ध नौका बुडाल्याची ही पहिलीच घटना होती. पाकिस्तानचा हा भारतावरचा एक ऐतिहासिक हल्ला होता.
मात्र जरी ही युद्धनौका बुडाली असली तरी १९७१ च्या युद्धाच्या परिणामांवर याचा काही परिणाम झालेला नाही. पाकिस्तानचे दोन तुकडे व्हायचे तसे झालेच. भारताने पाकिस्तानचा मोठा पराभव करत बांगलादेशची निर्मिती केली होती.