लग्नात पतीने जो फेटा घातला, त्‍यानेच घोटला त्‍याचा गळा, पत्‍नीकडून पतीची हत्‍या... File Photo
राष्ट्रीय

लग्नात पतीने जो फेटा घातला, त्‍यानेच घोटला त्‍याचा गळा, पत्‍नीने रागाच्या भरात..., पोलिसांकडून 24 तासात छडा!

एकमेकांवरील संशयामुळे आता आपल्या जोडीदाराचा जीव घेण्यापर्यंतच्या धक्कादायक घटनांमध्ये वाढ झाल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

habua police solved blind murder case wife killed husband over dance dispute

पुढारी ऑनलाईन :

सध्याच्या काळात नात्‍यांमध्ये मोठा दुरावा निर्माण होत चालला आहे. सततचे वाद, भांडणे, एकमेकांवरील संशयामुळे आता आपल्या जोडीदाराचा जीव घेण्यापर्यंतच्या धक्कादायक घटनांमध्ये वाढ झाल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

मध्य प्रदेशातील झाबुआमध्ये कैलाश माल नावाच्या एका व्यक्तीची संदिग्ध परिस्थितीत हत्‍या झाल्याचे समोर आले होते. पत्‍नीच्या चारित्र्यावर शंका आणि लग्नात नाचण्यावर झालेल्या वादानंतर पत्‍नीनेच आपल्या पतीची हत्‍या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी पत्‍नीला अटक केली आहे.

पोलिसांच्या तपासात हे समोर आले की, घटनेच्या रात्री कैलाश आणि त्‍याची पत्‍नी दोघेही एका लग्न समारंभात गेले होते. या ठिकाणी नाचण्यावरून कैलाशने पत्‍नीला सुनावले होते. तसेच नापसंती दर्शवली होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता.

कैलाशला सुरूवातीपासून आपल्या पत्‍नीच्या चारित्र्यावर शंका होती. यावरून पती-पत्‍नीमध्ये वादविवाद होत असत. दरम्यान एका रात्री या दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते. या रागातूनच पत्‍नीने रात्री घरात ठेवलेल्या पगडीची दोरी बनवली आणि गाढ झोपेत असलेल्या पतीचा गळा घोटला. यावेळी कोणी नसल्याने पोलिसांसमोर या घटनेतील आरोपीला पकडणे मोठे आव्हान होते.

मात्र वरीष्ठ पोलिसांच्या निर्देशावरून सायबर सेल आणि विशेष सेलच्या टीमची बांधणी करण्यात आली. पुराव्यांची साखळी जोडत-जोडत पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपी पत्‍नीला अटक केली. या वेगवान तपासाबद्दल एसपींनी पोलिसांच्या पथकाला रोख पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT