Crime News pudhari
राष्ट्रीय

Crime News: करवा चौथला मोठ्या भावाने आपल्या पत्नीला 'जोडवी' भेट दिल्याचा संशय; पतीने खलबत्त्याने चेचून केली हत्या

कवरा चौथच्या दिवशीच शहराला हादरवणारी घटना; पतीने खलबत्त्याने चेचून पत्नीची केली हत्या

Anirudha Sankpal

Crime News Gwalior Karva Chauth: ग्वाल्हेर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या मुरार भागात गुरूवारी सकाळी एक हादरवणारी घटना घडली. पतीने झोपताना पत्नीच्या डोक्यात आणि तोंडावर खलबत्त्याचे वार करत तिची हत्या केली. जोपर्यंत पत्नी मरत नाही तोपर्यंत पती तिच्यावर खलबत्त्याने वार करत होता. त्याने पत्नीच्या चेहऱ्यावर १७ वेळा वार केले. त्यामुळं चेहरा अत्यंत विद्रुप झाला. हे दृष्य पाहून पोलिसांच्या अंगावर देखील काटा आला.

मोठ्या भावासोबत प्रेम संबंध असल्याचा आरोप

माथेफिरू पती आनंद श्रीवास्तवला त्याच्या मधू श्रीवास्तव या आपल्या पत्नीवर संशय होता. त्याच्या पत्नीचे त्याच्या मोठ्या भावाशी प्रेम संबंध असल्याची शंका या पतीला होती. त्याने करवा चौथनिमित्त भेट म्हणून जोडवी दिली होती. त्यावरून पती रात्रभर भांडत होता. पत्नीने आपले प्रेमसंबंध असल्याचा सतत दावा करत होती. मात्र डोकं फिरलेल्या पतीने तिची ठेचून हत्या केली.

आनंद श्रीवास्तव पत्नी मधू सोबत मुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्यागी नगरमध्ये रहात होता. तो लष्कर येथील एका इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये काम करत होता. त्याने मधू सोबत अंतरजातीय प्रेम विवाह केला होता.

मृतदेहाजवळ रडत बसला होता

मिळालेल्या माहितीनुसार पत्नीची हत्या केल्यानंतर जवळपास दोन तास आनंद हा तिच्या मृतदेहाजवळ बसून रडत होता. त्यानंतर त्याने सकाळी १०.३० वाजता ११२ वर फोन करत आपण आपल्या पत्नीची हत्या केल्याचे आणि मृतदेह घरातच आहे असं सांगितलं.

त्यानंतर कंट्रोल रूमने ही माहिती संबंधित पोलीस ठाण्याला दिली. मुरार पोलीस ठाणे प्रभारी गोविंद बगौली हे फौज फाट्यासह घटनास्थळी पोहचले. मृतदेह पलंगावर होता. आरोपीने मृतदेहाचे तोंड चादर टाकून झाकलं होतं.

आरोपी ज्या घरात राहात होता त्यातील एका मोठ्या भागात त्याचा मोठा बाऊ आपली पत्नी आणि मुलांसोबत रहात होता. संपत्तीवरून या दोन भावांमध्ये सतत वाद होता. मधू आनंदला भावासोबत न भांडण्याचा सल्ला देत होती. पत्नीचा सल्ला आनंदने चुकीच्या पद्धतीनं घेतला.

जोडवीवरून वाद

आनंदला तिच्या पत्नीचे मधूचे मोठ्या भावासोबत प्रेम संबंध असल्याचा संशय आला. त्यामुळं तो कायम तिला ओरडत होता. मारत होता. बुधवारी सायंकाळी त्याने पुन्हा भांडण सुरू केलं. तो मधूला सतत तुला त्याने पायातील जोडवी भेट दिली आहेत असा आरोप करत होता. मधू नकार देत होती.

रात्रभर पती पत्नीमध्ये भांडण झालं. पत्नीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की ती फक्त त्याच्यावरच प्रेम करते. मी तुझ्यासाठीच करवा चौथचे व्रत ठेवले होते. मात्र तो काही मानायला तयार नव्हता. अखेर त्याने झोपताना पत्नीची हत्या केली.

मानसिक संतुलन ठीक नव्हतं

शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आनंद श्रीवास्तव याचे मानसिक स्वास्थ ठीक नव्हते. त्याच्यावर उपचार देखील सुरू होते. त्याला रूग्णालयात देखील ठेवलं होतं. मात्र पत्नीच त्याला परत घेऊन आली होती.

आनंद आणि मधू यांना दोन मुलं आहेत. एक १६ वर्षाची मुलगी आहे अन् एक १४ वर्षाचा मुलगा आहे. दोघांनीही पोलिसांना सांगितलं की ते दुसऱ्या खोलीत झोपले होते. त्यावेळी रात्रभर आई वडिलांच्या भांडणाचा आवाज ऐकू येत होता. वडील आम्हाला बाहेर येऊ देत नव्हते. आतच बसून रडत होते. पोलीस आले त्यावेळी शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT