गुरुग्राम येथील गोल्फ कोर्स रोडवर महिला बाइकर 'सिया'सोबत घडलेल्या भीषण हिट-ॲण्ड-रन घटनेचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. 
राष्ट्रीय

Hit and Run Case : 'आरोपीविरोधात गुन्‍हा दाखल करणार; पण ओळख समोर आणणार नाही'; अपघातग्रस्‍त महिला रायडर नेमकं काय म्‍हणाली?

आरोपी जीम चालक असून कार आर्मी कर्मचाऱ्याची असल्याचे तपासात उघड

पुढारी वृत्तसेवा

Hit and Run Case : गुरुग्राम येथील गोल्फ कोर्स रोडवर महिला बाइकर 'सिया'सोबत घडलेल्या भीषण हिट-ॲण्ड-रन घटनेचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या अपघातग्रस्‍त सियाने आपली भूमिका स्पष्ट करत, सायंकाळपर्यंत वकिलाच्या माध्यमातून पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल करून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे सियाने तिला पाठिंबा देणाऱ्या नागरिकांचे आभार मानले. अपघातातील दोषी व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे तिने नमूद केले. कोणत्याही माध्यमाशी संवाद साधणार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

मला माझी ओळख किंवा चेहरा जाहीर करायचा नाही

सियाने स्पष्ट शब्दांत सांगितले, "मला माझी ओळख किंवा चेहरा जाहीर करायचा नाही. त्यामुळे मी यावेळी कोणतीही मुलाखत देणार नाही." नागरिकांनी तिच्या या निर्णयाचा आदर करावा, असे आवाहन तिने केले आहे. तसेच, घटनेसंदर्भातील सर्व अपडेट्स ती इन्स्टाग्रामवरून देत राहील, असेही तिने नमूद केले.

काय घडलं होतं?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक कार तिच्या दुचाकीला जोरदार धडक देताना दिसत आहे. धडक लागताच सिया खाली पडली आणि तिची बाइक अनेक मीटर अंतरापर्यंत घसरत गेली. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. सियाच्या एका मित्राने पाठलाग करून ट्रॅफिक सिग्नलवर कार थांबवली; मात्र चालकाने अपघाताचा इन्कार करत तेथून काढता पाय घेतला.

कार मालक सैन्यदलात, मित्राने नेली होती कार

तपासात दुचाकीला धडक दिलेली कार ही मनीष नावाच्या व्यक्तीची असल्याचे समोर आले आहे. मनीषने सोशल मीडियावर स्पष्ट केले की, तो भारतीय सैन्यदलात (आर्मी) कार्यरत असून दोन दिवसांपूर्वी त्याचा मित्र कल्याण बैसला याने ती कार मागून नेली होती. कल्याण बैसला हा पलवलचा रहिवासी असून न्यू कॉलनी परिसरात जिम चालवतो. त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर त्याने 'इंटरनॅशनल कबड्डी प्लेयर' असा उल्लेख केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT