प्रसिद्ध पंजाबी गायक गुलाब सिद्धू यांच्या घरावर शनिवारी मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला.  
राष्ट्रीय

Gulab Sidhu House Firing : प्रसिद्ध पंजाबी गायक गुलाब सिद्धू घरावर अंधाधुंद गोळीबार; थरार CCTV मध्ये कैद

गुलाब सिद्धू ऑस्ट्रेलियात असल्याने अनर्थ टळला, कुटुंबातील सदस्य सुरक्षित

पुढारी वृत्तसेवा

Gulab Sidhu House Firing : प्रसिद्ध पंजाबी गायक गुलाब सिद्धू यांच्या घरावर शनिवारी मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला. तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन बुरखाधारी व्यक्तींनी घराच्या बाहेर तब्बल ८ राउंड फायर केल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबाराच्या या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराट पसरली असून, ही संपूर्ण वारदात जवळच असलेल्या एका CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गुलाब सिद्धू हे दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (शुभदीप सिंह) यांचे अत्यंत जवळचे मित्र मानले जातात.

मध्यरात्री १.३३ वाजता घडला थरार

CCTV फुटेजमध्ये गोळीबाराची घटना कैद झाली आहे. ही घटना मध्यरात्री सुमारे १ वाजून ३३ मिनिटांनी घडली. तीन नकाबपोश व्यक्ती एका दुचाकीवरून आल्या आणि त्यांनी गुलाब सिद्धू यांच्या घराच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात मोठी दहशत पसरली. घटनेची माहिती मिळताच 'थाना सदर'चे पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसराची पाहणी केली आहे.

गायक परदेशात, कुटुंबातील सदस्य सुरक्षित

गावाचे सरपंच जगसीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी गायक गुलाब सिद्धू त्यांच्या 'टूर' कार्यक्रमांच्या निमित्ताने सध्या ऑस्ट्रेलियात आहेत. मात्र, गोळीबार झाला त्यावेळेस त्यांचे कुटुंब घरातच उपस्थित होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही.

गँगस्टर हिटलिस्टवर अन् मूसेवालांचे जवळचे मित्र

गुलाब सिद्धू हे दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (शुभदीप सिंह) यांचे अत्यंत जवळचे मित्र मानले जातात. त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरही 'जस्टिस फॉर सिद्धू मूसेवाला' असा उल्लेख आहे. यापूर्वीही गुलाब सिद्धू यांना काही गँगस्टर्सकडून धमक्या आल्याची माहिती आहे, ज्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना दोन सुरक्षारक्षक (गनमॅन) देखील पुरवले होते. अलीकडेच रिलीज झालेल्या त्यांच्या 'जुडा' या गाण्याला यूट्यूबवर अवघ्या दोन महिन्यांत ७४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या पोलिसांनी CCTV फुटेज ताब्यात घेतले असून त्याआधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT