Gujarat Terrorist Arrest pudhari
राष्ट्रीय

Gujarat Terrorist Arrest: गुजरातमध्ये ATS ची मोठी कारवाई जैश ए मोहम्मदशी संबंधित ५ संशयितांना अटक

Anirudha Sankpal

Gujarat Terrorist Arrest: दहशतवादी विरोधी पथकाने गुजरातमध्ये मोठी कारवाई केली आहे. गुजरातच्या वेगवेगळ्या शहरांमधून एटीएसने जैश - ए - मोहम्मदशी संबंधीत पाच आणि इतर संशयितांना अटक करण्यात आली आहे.

अटक केलेल्या आरोपींमध्ये बिलाल आबिद शेरा, मोहम्मद अयुब काडीवाल उर्फ मोहम्मद खडियासन, मोहम्मद शफी मुखी उर्फ शफी चापी, मोहम्मद हसन कराडिया उर्फ हसन हैदरपुरी आणि मोहम्मद असुब सुमासरा उर्फ मोहम्मद खली यांचा समावेश आहे.

गेल्या महिन्या अटक केलेल्या दहशतवाद्यांशी संबंध

गुजरात एटीएसने पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद यांच्याशी संबंधित दहशतवाद्यांनी अटक केली आहे त्यांचा संबंध हा गेल्या महिन्यात देशभरातून अटक करण्यात आलेल्या आठ दहशवाद्यांशी आहे.

गुजरातमध्ये दहशवादी संघटनेचे स्लीपर सेल तयार करण्यासाठी जैश-ए-मोहम्मद अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होता. गुजरात दंगलीनंतर इंडियन मुजाहिद्दीनने अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यात ५० पेक्षा जास्त लोकांची हत्या करण्यात आली. तर २०० पेक्षा जास्त लोकं जखमी झाले होते.

गुजरातवर पकड मिळवण्याचा प्रयत्न

जैश-ए-मोहम्मद देखील सतत भारतात विशेषकरून गुजरातमध्ये अपली पकड मिळवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळं गुजरातमधील काही लोकांना आपल्याशी जोडून घेत दहशवादी कारवाया वाढवण्याची संधी मिळवण्याचा प्रयत्न झाला होता.

एटीएस पोलीस उपाधीक्षक हर्ष उपाध्याय यांनी सांगितलं की आधी अटक केलेल्या ८ दहशतवाद्यांच्या संपर्कात आलेल्या या पाच संशयित युकवांना पोलिसांनी अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT