GST Collection Growth | जीएसटी संकलनात २३ टक्क्यांची घसघशीत वाढ! Pudhari File Photo
राष्ट्रीय

GST Collection Growth | जीएसटी संकलनात २३ टक्क्यांची घसघशीत वाढ!

ऑक्टोबरमध्ये सरकारी खजिन्यात जमा झाले तब्बल २.३१ लाख कोटी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात सरकारी खजिन्यात जीएसटीच्या माध्यमातून मोठी भर पडल्याचे समोर आले आहे. १ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२६ मध्ये देशाचे एकूण जीएसटी संकलन २.३१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यात तब्बल २३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

गेल्या चार वर्षांतील जीएसटी संकलनातील ही सर्वाधिक वेगवान वाढ आहे. विशेष म्हणजे, सलग चौथ्या महिन्यात केंद्र सरकारला दोन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक जीएसटी महसूल मिळाला आहे. सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलनातील वार्षिक वाढ १४.७ टक्के होती. तसेच चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये एप्रिलनंतर ऑक्टोबर महिन्यातील संकलन सर्वाधिक ठरले आहे. एप्रिलमध्ये सरकारला २.४३ लाख कोटी रुपयांचा जीएसटी महसूल मिळाला होता. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलन वाढण्यामागे आयात आणि देशांतर्गत बाजारातील व्यवहारांचा मोठा वाटा आहे. मात्र, देशांतर्गत व्यवहारांच्या तुलनेत आयातीतून मिळणाऱ्या कर महसुलात अधिक वेगाने वाढ झाली आहे.

एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान किती जीएसटी जमा?

* जीएसटी संकलनाचा प्रकार एप्रिल ते ऑक्टोबर २०२६

* एकूण जीएसटी संकलन १४.७८ लाख कोटी

* वार्षिक वाढ १३.२ टक्के

* निव्वळ जीएसटी संकलन १२.६९ लाख कोटी

* निव्वळ संकलनातील वार्षिक वाढ १३ टक्के

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT