New Rules For Retired Army Officers Books pudhari photo
राष्ट्रीय

New Rules: नरवणेंसारखं आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर पुस्तक लिहिता येणार नाही...? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

New Rules For Retired Army Officers Books: वरिष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांसाठी कूलिंग ऑफ कालावधी लागू होणार?

Anirudha Sankpal

New Rules For Retired Army Officers Books: केंद्रीय राजकारणात सध्या निवृत्त लष्कर प्रमुख एमएम नरवणे यांच्या फोर स्टार्स ऑफ डेस्टनी या पुस्तकावरून रणकंदन माजलं आहे. नरवणे यांचे पुस्तक अजून प्रकाशित झालेले नाही. मात्र या अप्रकाशित पुस्तकातील काही मजकूर विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदेत वाचून दाखवल्याने मोठा गदारोळ झाला होता.

बंधन येणार?

आता केंद्र सराकर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या अशा पुस्तक लिहिण्यावर मोठे निर्बंध आणण्याच्या तयारीत आहे. सरकार वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर पुस्तक लिहिण्यापूर्वी २० वर्षाचा कूलिंग ऑफ काळ लादण्याची शक्यता आहे. यात लष्कीर अधिकाऱ्यांचा देखील समावेश असणार आहे.

कूलिंग ऑफ काळ लागू होणार?

हा निर्णय मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तक फोर स्टार्स ऑफ डेस्टनीच्या वादानंतर घेण्यात आला आहे. शुक्रवारी केंद्रीय कॅबिनेटपुढे हे वादग्रस्त पुस्तक आलं होत. त्यावेळी अनेक मंत्र्यांना जे मोठ्या पदावर कार्यरत होते त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना पुस्तक लिहिण्यापासून किंवा त्याला आपलं नाव देण्यापासून रोखण्यासाठी एक कूलिंग ऑफ काळ असावा असं मत व्यक्त केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार २० वर्षाचा कूलिंग ऑफ काळ लागू करण्याबाबतचे आदेश लवकरच देण्यात येण्याची शक्यता आहे.

कॅबिनेटच्या बैठकीतील २७ पॉईंट अजेंड्यामध्ये हा मुद्दा नव्हता. हा मुद्दा एका सर्वसाधारण चर्चेदरम्यान उपस्थित झाला असं देखील सूत्रांनी सांगितलं आहे. हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार याचबरोबर अमेरिकेतील एपस्टीन फाईलचा देखील मुद्दा चर्चेत आला होता. यावेळी मंत्र्यांनी सरकारनं याबाबतची आपली भूमिका कायम ठेवावी आणि विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देऊ नये असं मत नोंदवलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT