सोने दरात तेजी कायम आहे. file photo
राष्ट्रीय

Gold Rate Today | सोने- चांदी महागली, जाणून घ्या नवे दर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

सोने- चांदी दरात तेजी कायम आहे. शुद्ध सोन्याचा दर (Gold Rate Today) आज गुरुवारी २०९ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ७२,४३५ रुपयांवर खुला झाला आहे. काल बुधवारी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७२,२२६ रुपयांवर बंद झाला होता. त्यात आज वाढ दिसून आली. चांदीही महागली आहे. चांदीचा दर आज प्रति किलो ८९,८४३ रुपयांवर खुला झाला आहे. चांदीच्या दरात आज १४५ रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज गुरुवारी शुद्ध सोने म्हणजेच २ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ७२,४३५ रुपये, २२ कॅरेट ६६,३५१ रुपये, १८ कॅरेट ५४,३२६ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४२,३७५ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ८९,८४३ रुपयांवर पोहोचला आहे.

यंदा सोन्याच्या दरात ९ हजारांनी वाढ

यावर्षी सोन्याच्या दरात सुमारे ९ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६३ हजारांवर होता. आता तो ७२ हजारांवर पोहोचला आहे. तर चांदी यावषी प्रति किलोमागे सुमारे १६ हजारांनी महागली आहे.

असे ओळखा शुद्ध सोने

सराफा बाजारात २४ कॅरेट हे शुद्ध सोने समजले जाते. पण, दागिने घडणावळीसाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे नमूद केलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT