शुद्ध सोन्याचा दर पुन्हा ७२ हजारांजवळ गेला आहे. file photo
राष्ट्रीय

Gold Price Today | सोने पुन्हा ७२ हजारांजवळ, चांदीही महागली

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

सोने- चांदी दरात बुधवारी (दि.३) बदल झाला आहे. आज शुद्ध सोन्याच्या दरात (Gold Price Today) २९१ रुपयांनी वाढ होऊन दर प्रति १० ग्रॅम ७१,९८३ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदी ८४२ रुपयांनी महागली आहे. चांदीचा दर आज प्रति किलो ८८,८५७ रुपयांवर खुला झाला आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७१,९८३ रुपये, २२ कॅरेट ६५,९३६ रुपये, १८ कॅरेट ५३,९८७ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४२,११० रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ८८,८५७ रुपयांवर खुला झाला आहे.

MCX वर सोने तेजीत

सकारात्मक जागतिक संकेतांचा मागोवा घेत आज देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. ५ ऑगस्टच्या डिलिव्हरी सोन्याचा दर MCX वर सुमारे ०.६ टक्क्यांनी वाढून ७२ हजारांवर पोहोचला.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट हे शुद्ध सोने मानले जाते. पण, दागिने घडणावळीसाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर होतो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे नमूद केलेले असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT