अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील कस्टम ड्युटीत कपात केल्याच्या घोषणेनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. file photo
राष्ट्रीय

Gold Price Today | सोने ५ हजारांनी, चांदी ६,८०० रुपयांनी स्वस्त, आजचा दर काय?

सोने- चांदीवरील कस्टम ड्युटीत कपात केल्याने दरात घसरण

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

अर्थसकंल्पाच्या आधी २२ जुलै रोजी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७३,२१८ रुपये होता. पण २३ जुलै रोजी अर्थसंकल्पातून सोने- चांदीवरील कस्टम ड्युटीत कपात केल्याच्या घोषणेनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. गेल्या ४ दिवसांत २४ कॅरेट सोने (Gold Price Today) प्रति १० ग्रॅममागे ५,१४९ रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४,७१७ रुपयांनी कमी झाला आहे. चांदीच्या दरात चार दिवसांत प्रति किलोमागे ६,८६० रुपयांची घट झाली आहे. आज शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ६८,०६९ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ८१,३३६ रुपयांवर आला आहे.

Gold Price Today : सध्याचा सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर (२६ जुलै)

  • २४ कॅरेट- ६८,०६९ रुपये

  • २२ कॅरेट- ६२,३५१ रुपये

  • १८ कॅरेट- ५१,०५२ रुपये

  • १४ कॅरेट- ३९,८२० रुपये

  • चांदीचा दर - प्रति किलो ८१,३३६ रुपये

अर्थसंकल्पाआधीचा सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर (२२ जुलै)

  • २४ कॅरेट- ७३,२१८ रुपये

  • २२ कॅरेट- ६७,०६८ रुपये

  • १८ कॅरेट- ५४,९१४ रुपये

  • १४ कॅरेट- ४२,८३३ रुपये

  • चांदीचा दर - प्रति किलो ८८,१९६ रुपये

(स्त्रोत - India Bullion & Jewellers Association)

सोने- चांदी स्वस्त

केंद्रीय अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील कस्टम ड्युटी १५ टक्क्यांवरुन ६ टक्क्यांवर आणण्यात आली. यामुळे सोने, चांदी दरात घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज शुक्रवारी २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ६८,०६९ रुपये, २२ कॅरेट (22 Carat Gold Rate) ६२,३५१ रुपये, १८ कॅरेट ५१,०५२ रुपये, १४ कॅरेटचा दर ३९,८२० रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ८१,३३६ रुपयांवर खुला झाला आहे.

Gold Rate Today : शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट (९९९) हे शुद्ध सोने असते. पण, दागिन्यांसाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर होतो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट (18 Carat Gold Rate) सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे नमूद केलेले असते. जर १४ कॅरेट दागिन्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT