Genetic Switch Pregnancy | गर्भधारणेच्या जनुकीय ‘स्विच’चे रहस्य उलगडले 
राष्ट्रीय

Genetic Switch Pregnancy | गर्भधारणेच्या जनुकीय ‘स्विच’चे रहस्य उलगडले

गर्भाशयात गर्भधारणा कशी होते, याचे गूढ उलगडणारा शोध

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; पीटीआय : भारतीय शास्त्रज्ञांनी गर्भधारणेच्या प्रक्रियेत क्रांतिकारी शोध लावला आहे. गर्भाशयाच्या भिंतीत असणारा एक जनुकीय ‘स्विच’ (बटण) गर्भधारणेची सुरुवात कशी होते हे ठरवतो, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या शोधामुळे वंध्यत्व, पुनःपुन्हा होणारे गर्भपात आणि ‘आयव्हीएफ’ उपचारांतील यशाचा दर वाढवण्यासाठी नवे मार्ग खुले होतील, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हा शोध "Cell Death Discovery' या आंतरराष्ट्रीय विज्ञान जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे आणि भारतीय विज्ञान क्षेत्रासाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.

काय आहे जनुकीय ‘स्विच’?

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह अँड चाईल्ड हेल्थ, बनारस हिंदू विद्यापीठ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर यांच्या संयुक्त संशोधनातून हा शोध लागला आहे. या अभ्यासात दोन प्रमुख जनुके HOXA10 आणि ढथखडढ2 गर्भाशयाच्या भिंतीवर एक लहान द्वार योग्यवेळी उघडते किंवा बंद करते, हे स्पष्ट झाले आहे.

गर्भधारणा होण्यासाठी भ्रूण (शालीूे) आईच्या गर्भाशयाच्या भिंतीवर चिकटून बसणे आवश्यक असते. गर्भाशयाची आतील भित्तिका सामान्यतः मजबूत आणि बंद असते, जणू किल्ल्याची भिंतच. मात्र, भ्रूण येताच कजदअ10 हे जनुक त्या ठिकाणी तात्पुरते बंद होते आणि ढथखडढ2 सक्रिय होते. ढथखडढ2 सक्रिय झाल्यावर गर्भाशयातील पेशी मऊ आणि लवचिक होतात, त्यामुळे त्या थोड्या हलतात आणि गर्भाला आत प्रवेश मिळतो.

संतुलन महत्त्वाचे

या प्रक्रियेत संतुलन अत्यंत महत्त्वाचे आहे. जर गर्भाशयाची भिंत पुरेशी उघडली नाही, तर गर्भ चिकटू शकत नाही आणि भिंत खूपच उघडली, तर गर्भधारणा टिकू शकत नाही. कजदअ10 आणि ढथखडढ2 या जनुकांच्या संतुलनावर गर्भधारणा यशस्वी होणे अवलंबून असते. या शोधामुळे ‘आयव्हीएफ’ उपचारांतील यश दर वाढवण्यासाठी आणि पुनःपुन्हा होणार्‍या गर्भधारणेच्या अपयशाचे कारण शोधण्यासाठी नवे मार्ग उपलब्ध होतील, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

सर्व सस्तन प्राण्यांमध्ये आढळणारी प्रक्रिया

हा जनुकीय स्विच उंदरांपासून माकड, हॅम्स्टर आणि मानवी पेशींमध्येही आढळला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया उत्क्रांतीच्या द़ृष्टीने अत्यंत प्राचीन आणि सर्व सस्तन प्राण्यांसाठी आवश्यक आहे, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

महिलांच्या आरोग्यासाठी नवा आशावाद

या शोधामुळे गर्भधारणेच्या सुरुवातीला होणारे अपयश, पुनःपुन्हा होणारे गर्भपात आणि वंध्यत्व यासारख्या समस्यांवर नवे उपाय शोधता येतील. तसेच, भविष्यात गर्भधारणा अधिक यशस्वी होण्यासाठी आणि ‘आयव्हीएफ’ उपचार सुधारण्यासाठी या जनुकीय ‘स्विच’चा वापर करता येईल, असे o ICMR-NIRRCH च्या संचालिका डॉ. गीता सचदेव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT