तेल अवीव; वृत्तसंस्था : इस्रायलने गाझामध्ये मोठी लष्करी कारवाई करण्याची योजना आखली आहे. या योजनेनुसार सध्या पॅलेस्टिनी नागरिक राहात असलेल्या आणि युद्ध क्षेत्रातून त्यांना दक्षिणेकडे ढकलण्यासाठी नवे हल्ले करण्याची योजना आखली आहे. त्याचवेळी ओलिसांचे कुटुंबीय आणि इस्रायलसह जगभरातील मानवतावादी संघटनांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
इस्रायलने गाझा पट्टीतील काही सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये लष्करी कारवाई तीव्र करण्याची घोषणा केली आहे.
नागरिकांचे स्थलांतर, लढाईच्या भागातून पॅलेस्टिनी नागरिकांना दक्षिण गाझामध्ये हलवण्याची तयारी सुरू आहे.
तंबूंचा पुरवठा : विस्थापित नागरिकांसाठी तंबूंचा पुरवठा पुन्हा सुरू केला जाईल, असे इस्रायली लष्कराच्या मानवतावादी शाखेने (COG-T) सांगितले आहे.
लक्ष्य : हमासला पराभूत करणे हे या कारवाईचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी म्हटले आहे.
लक्ष्य होणारी क्षेत्रे : मुवासी, गाझा शहर आणि मध्यवर्ती छावण्या (नुसेरात आणि बुरैज) या भागांमध्ये कारवाई व्यापक केली जाणार आहे.
सरकारवर दबाव : युद्ध थांबवून ओलिसांच्या सुटकेसाठी करार करावा, अशी मागणी कुटुंबीय आणि काही माजी लष्करी अधिकार्यांनी केली आहे.
भावनिक साद : मला माझ्या जिवलग मित्राची आठवण येते. - पुष्पा जोशी (नेपाळी ओलिस बिपिन जोशी यांची बहीण)
संयुक्त राष्ट्रे : गाझामध्ये अन्न आणि इतर मदत पोहोचवणे अत्यंत आव्हानात्मक बनले आहे. उपासमारीची पातळी धोकादायक आहे.
अमेरिका : अमेरिकेने गाझातील नागरिकांसाठी तात्पुरते व्हिजिटर व्हिसा देणे थांबवले आहे आणि या प्रक्रियेचा आढावा घेतला जात आहे.