राष्ट्रीय

Gas Rate : निवडणुकीनंतर घरगुती सिलिंडरचे दर हजार रुपयांच्या पुढे जाणार?

backup backup

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यानच्या युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. परिणामी येत्या काही दिवसांत पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ अटळ मानली जात असून पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर सबसिडीच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर एक हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Gas Rate)

जागतिक बाजारातील इंधन दराचा आढावा घेऊन दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडर दरात बदल केले जातात. त्यानुसार मंगळवारी 1 मार्च रोजी गॅस सिलिंडर दरात वाढ केली जाण्याचे संकेत आहेत. गेल्या जानेवारी महिन्यापासून इंधन दरात वाढ सुरू आहे; मात्र तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर स्थिर ठेवलेले आहेत. (Gas Rate)

रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचे प्रती बॅरलचे दर शंभर डॉलर्सवर पोहोचले आहेत. येत्या महिनाभरात हे दर
115 डॉलर्सवर जाण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

6 ऑक्टोबरपासून एलपीजी सिलिंडर दरात वाढ करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर निवडणूक पार पडल्यानंतर म्हणजे 7 मार्चनंतर कधीही सिलिंडरचे दर 100 ते 200 रुपयांनी वाढविले जाऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

SCROLL FOR NEXT