नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दक्षिण आशियातील कोट्यवधी लोकांसाठी जीवनदायिनी असलेली गंगा नदी सर्वात मोठ्या आणि जलद वेगाने कोरडी पडत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हवामान बदल, मान्सूनमध्ये होणारे बदल, पाण्याचा अनिर्बंध उपसा आणि धरणांमुळे ही ‘महानदी’ कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संपूर्ण क्षेत्रातील अन्न, पाणी आणि उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार आहेत.
हिमालय ते बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेल्या या नदीच्या खोर्यावर 650 दशलक्षहून अधिक लोक अवलंबून आहेत. भारताच्या एक चतुर्थांश गोड्या पाण्याचा आणि आर्थिक मूल्याचा आधार हीच गंगा आहे. मात्र, नवीन संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नदीचा र्हास रेकॉर्ड केलेल्या इतिहासातील वेगापेक्षा जास्त आहे. एका नवीन अभ्यासामध्ये शास्त्रज्ञांनी 1,300 वर्षांपूर्वीचे जलप्रवाह रेकॉर्ड तपासले आहेत. यात असे दिसून आले आहे की, या खोर्याला दुष्काळ काही दशकांतच जाणवले आहेत आणि ते नैसर्गिक हवामान बदलाच्या मर्यादेपलीकडे आहेत.
विक्रमी र्हास : नवीन संशोधनानुसार, गेल्या काही दशकांतच गंगा खोर्यात सर्वात मोठे
दुष्काळ पडले आहेत.
मानवी दाब : 1,000 हून अधिक धरणे आणि भूजलाचा अनिर्बंध उपसा हे मानवी कारण आहे.
ग्लेशियरचा धोका : गंगोत्री हिमनदी दोन दशकांत एक किलोमीटरने मागे सरकली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील
प्रवाह कमी होईल.
भविष्यातील संकट : कृती न केल्यास पुढील काही दशकांत लाखो लोकांना गंभीर अन्नटंचाईचा सामना करावा लागेल.