राष्ट्रीय

पाटण्यात 30 लाखांच्या मुकुटाचा गणपती!

दिनेश चोरगे

पाटणा : अवघ्या देशभरात आजपासून गणेश चतुर्थीची धामधूम सुरू होत असून, सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यादरम्यान, पाटण्यात 30 लाखांच्या मुकुटाचा गणेश विराजमान होत आहे. या गणेशाचा मुकुट हिरेजडीत असेल आणि वस्त्रही सुवर्णजडीत असणार आहे.

'लालबागचा राजा'च्या धर्तीवर पाटणा महाराष्ट्र मंडळ उत्सवाची तयारी करत आहे. महाराष्ट्रातील 12 कारागिरांनी या 30 लाखांच्या मुकुटासाठी बरीच मेहनत घेतली. मंडपासाठीही मुंबईतील पथक बोलावण्यात आले आहे. नारीशक्तीचे सशक्तीकरण हेदेखील यंदाचे ठळक वैशिष्ट्य ठरणार आहे. यंदा उत्सवाचे सर्व आयोजन महिला मंडळातर्फे होत आहे. या सर्व महिला पाटणा महाराष्ट्र मंडळाच्या सदस्य आहेत.

SCROLL FOR NEXT