राष्ट्रीय

G7 summit : PM मोदी इटलीत दाखल, जाणून घ्‍या दौर्‍याचे महत्त्‍व

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीमध्‍ये दाखल झाले आहेत. येथे ते G-7 आउटरीच सत्रात सहभागी होणार आहेत. (G7 चे सदस्य देश आणि आमंत्रित गैर-सदस्य सहभागी होतात त्यांना "आउटरीच सत्र" म्हणतात.) या परिषदेबरोबरच पंतप्रधान मोदी हे इटलीच्‍या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्‍याशी द्विपक्षीय चर्चा करतील.

पंतप्रधान मोदींचा इटली दौरा ठरणार महत्त्वपूर्ण

पंतप्रधान मोदी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत. मार्च 2023 मध्ये मेलोनी यांच्या भारत भेटीनंतर पंतप्रधान मोदींची ही दुसरी भेट असेल. मोदी गुरुवारी उच्चस्तरीय शिष्टमंडळासह इटलीला दाखल झाले आहेत. या भेटीमुळे पंतप्रधान मोदींना भारत आणि ग्लोबल साउथच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर शिखर परिषदेत उपस्थित असलेल्या इतर जागतिक नेत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या परिषदेमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्‍यो बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होऊ शकते.


एआयसह ऊर्जा आणि भूमध्य समुद्रावर लक्ष केंद्रित केले जाईल: पंतप्रधान मोदी

इटलीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका निवेदनात म्हटले होते की, इटलीच्‍या पंतप्रधान मेलोनी यांच्या निमंत्रणावरून मी 14 जून रोजी G-7 आउटरीच समिटमध्ये सहभागी होण्यासाठी इटलीच्या अपुलिया प्रदेशाला भेट देणार आहे. G-7 शिखर परिषदेसाठी सलग तिसऱ्यांदा माझी पहिली भेट इटलीला गेल्याचा मला आनंद आहे. आउटरीच सत्रादरम्यान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एनर्जी, आफ्रिका आणि भूमध्यसागरावर चर्चा होईल.

G-20 शिखर परिषद आणि भारताने आयोजित केलेल्या G-7 शिखर परिषदेच्या परिणामांमध्ये अधिक समन्वय आणण्याची आणि जागतिक दक्षिणेसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची ही संधी असेल. मी शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या इतर नेत्यांना भेटण्यास उत्सुक असल्‍याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्‍हटलं होतं.

SCROLL FOR NEXT