नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील नागरिकांना येत्या १ जानेवारीपासून ४५० प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या मोफत करता येतील, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ( दि. १३ ) सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. सध्या 212 प्रकारच्या चाचण्या मोफत करण्याची मुभा दिल्लीच्या नागरिकांना आहे.
मोहल्ला क्लिनिक आणि सरकारी रुग्णालयांमध्ये लोकांना 450 प्रकारच्या चाचण्या मोफत करुन घेता येतील. सर्व नागरिकांना मोफत आरोग्य आणि शिक्षण सुविधा उपलब्ध करुन देणे, हे आप सरकारचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या काळात आरोग्य सुविधा महाग झालेल्या आहेत. अशा स्थितीत मोफत चाचण्यांच्या सुविधेचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गियांना मोठ्या प्रमाणात होईल, असे केजरीवाल यांनी नमूद केले.